अठरा कर्मचार्‍यांचे दोन दिवसांचे वेतन कापा : राज्यमंत्री बच्चू कडू | पुढारी

अठरा कर्मचार्‍यांचे दोन दिवसांचे वेतन कापा : राज्यमंत्री बच्चू कडू

कोळगाव : पुढारी वृत्तसेवा

जलसंपदा, शिक्षण व कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांनी श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर जेलची अंतर्गत पाहणी केली. यावेळी कार्यालयातील आवक-जावक रजिस्टरमध्ये अनियमितता असल्याने 18 कर्मचार्‍यांचे दोन दिवसांचे वेतन कपात करण्याचा आदेश त्यांनी दिला. जेल अधिकार्‍यांना तातडीने सर्व क्षेत्राला कंपाऊंड करणे, तसेच कैद्यांना सोयीसुविधा पुरविण्याचे आदेश दिले.

कैद्यांच्या सोयी-सुविधांसाठी स्वतः बच्चू कडू यांनी 11 हजार रुपयांची देणगी दिली

जेलमधील भिक्षेकरी गृह, कैद्यांसाठी वापरण्यात येणारे सौचालय, बाथरूम, पाण्याची सुविधा आदींविषयी पाहणी केली. कैद्यांना पुरविण्यात येणारे कपडे, जेवण याविषयी प्रत्यक्ष कैद्यांची चर्चा केली. कैद्यांशी बोलताना बच्चू कडू यांनी डॉक्टर नियमितपणे जेलमध्ये येतात का, सर्वांची तपासणी केली जाते का असे विचारले.

आसाममध्ये पुराचा हाहाकार; १८ जणांचा मृत्यू

कैद्यांसाठी आठवड्याच्या आत गाद्या उपलब्ध करून देण्यास सांगितले. नियमानुसार जेलमध्ये असणार्‍या सर्व सुख सुविधा तातडीने उपलब्ध करून करण्यास जेल प्रमुख गारुडकर यांना आदेशित केले. राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यासमवेत श्रीगोंदा प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष सुपेकर, शहराध्यक्ष माने, रासकर, माजी अध्यक्ष खामकर, विजय भंडारी, संपत शिरसाठ, बाळासाहेब काटे, जब्बार सय्यद, सचिन जठार, खंडेराव जठार, दानिश सय्यद, श्रीगोंदा, विसापूर, कोळगाव येथील प्रहार संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी राज्यमंत्री बच्चू कडू यांचा बाळासाहेब काटे, जब्बार शेख, खंडेराव जठार, दानिश सय्यद यांनी विसापूर जनतेतर्फे सत्कार केला.

‘ती’ खोली संरक्षित करण्याचे आदेश

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण ज्या खोलीमध्ये तीन महिने कैदेत होते, ती खोली व्यवस्थित संरक्षित करण्याची जेल प्रमुखांना सांगितले. भिक्षेकरी गृहासाठी लवकरच निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यांनी तेथील कर्मचारी, अधिकार्‍यांच्या ही समस्या जाणून घेतल्या.

हे ही वाचा :

Kanika Kapoor : लग्नानंतर कनिकचे गौतमसोबत लिपलॉक (Photo Viral)

मडगाव : देवाला नमस्कार करून चोरली फंडपेटी

Back to top button