मडगाव : देवाला नमस्कार करून चोरली फंडपेटी

मडगाव : देवाला नमस्कार करून चोरली फंडपेटी

मडगाव : पुढारी वृत्तसेवा
केपे येथील श्री दत्तमंदिरातील फंडपेटी चोरट्यांनी लंपास करून केली. त्यातील सुमारे 50 हजार रुपयांची रक्कम चोरून फंडपेटी परिसरात टाकून पळ काढला. ही घटना शनिवारी पहाटे घडली. चोरीचा हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे.

ही घटना 21 रोजी पहाटे तीन वाजता घडली. चोरट्यांनी मंदिराच्या खिडकीचे लोखंडी ग्रील कापून आता प्रवेश केला. मंदिरात देवाला नमस्कार करून चोरट्यांनी फंडपेटी चोरली. मंदिर परिसरातून वाहणार्‍या कुशवती नदीच्या काठावर चोरट्यांनी फंडपेटी फोडली. त्यातील रोकड घेऊन फंडपेटी तेथेच टाकून पळ काढला. मंदिराच्या नजीक पुजार्‍यांचे घर आहे. चोरी करताना चोरट्यांचे लक्ष पूजार्‍यांच्या घराकडे लागून होते. त्यांच्या हातात धारदार शस्त्र असल्याचे सीसीटीव्ही कॅमेरामध्ये दिसून आले आहे. सकाळी पुजार्‍यांना मंदिरात प्रवेश करताना चोरी झाल्याचे दिसून आले. त्यांनी ताबडतोब मंदिराच्या समिती सदस्यांसह पोलिसांना माहिती दिली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news