वाडिया पार्कसाठी 15 कोटींचा निधी मंजूर : आमदार संग्राम जगताप

वाडिया पार्कसाठी 15 कोटींचा निधी मंजूर : आमदार संग्राम जगताप
नगर : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील खेळाडूंना अद्यावत सुविधा निर्माण करून देण्यासाठी वाडियापार्क जिल्हा क्रीडा संकुल अद्यावत करण्यासाठी व खेळाडूंना परिपूर्ण सुविधा निर्माण करण्यासाठी शासनाकडे जिल्हा क्रीडा अधिकार्‍यामार्फत 52 कोटींचा प्रस्ताव पाठविला होता. क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत वाडियापार्क क्रीडा संकुलासाठी 15 कोटींचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली. आमदार जगताप म्हणाले, विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही करिअर करण्याच्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.
तरी खेळाडूंना विविध खेळाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे गरजेच्या आहे. त्यासाठी यापूर्वी शासनाच्या माध्यमातून सारसनगर येथे विविध खेळांचे क्रीडा संकुल उभे राहत असून त्याचे काम देखील अंतिम टप्प्यात आहे. या ठिकाणी खेळाडूंना विविध खेळाचे प्रशिक्षणही दिले जाणार आहे. वाडियापार्क क्रीडा संकुलात खेळाडुंना चांगल्या दर्जेच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी यापूर्वी पाहणी केली होती. त्यानुसार आज मंत्रालयामध्ये बैठक झाली. वाडियापार्क क्रीडा संकुलाच्या बळकटीकरणासाठी व खेळाडूंना अद्यावत सुविधा निर्माण करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरू आहे. भविष्यकाळात वाडियापार्क क्रीडा संकुलाच्या माध्यमातून शहर व जिल्ह्यात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार होती, असेही ते म्हणाले.

अत्याधुनिक व्यायामशाळा उभारणार

वाडिया पार्कमध्ये खेळाचे समोलचन करण्यासाठी कक्षाची निर्मिती करण्यात येणार आहे. त्याचबरोबर प्रेक्षक बैठक व्यवस्थेला रोप कव्हर बसविण्यात येणार आहे. वीजेच्या बचतीसाठी सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. तसेच नागरिकांसाठी स्वतंत्र अत्याधुनिक जिमही निर्माण करण्यात येणार आहे. प्रत्येक खेळाच्या मैदानाजवळ खेळाडूंसाठी अत्याधुनिक व्यायामशाळेची निर्मिती करण्यात येणार आहे. त्या माध्यमातून खेळाडू व नागरिकांचे आरोग्य सुदृढ व निरोगी राहण्यास मदत होईल, अशी भावना आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केली.

वाडिया पार्कमधील नवनिर्मिती

  • संपूर्ण मैदानावर लॉन तयार करण्यात येणार
  • क्रिकेटसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे तीन टर्फ विकेट होणार
  • प्लड लाईटची सुविधा निर्माण होणार
  • धावपट्टूंसाठी 400 मीटर सिंथेटिक ट्रॅक
  •  कुस्ती पट्टूंसाठी मातीचा हौद
  • बॉक्सिंग, बॅडमिंटन खेळाडूसाठी हॉल
  •  रायफल शुटिंगसाठी अत्याधुनिक मैदान
  • सिथेंटिक टेनिस कोर्टची निर्मिती
  • कबड्डी, खो-खो व बास्केट बॉलसाठी मैदान, त्यावर डोम कव्हर

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news