10 th result : श्रीगोंदा तालुक्यात मुलींचीच बाजी

10 th result : श्रीगोंदा तालुक्यात मुलींचीच बाजी

श्रीगोंदा : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील येळपणे गटातील सहा शाळांचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. बहुतांश शाळांत बारावीपाठोपाठ दहावीच्या निकालातही मुलांपेक्षा मुलीच अग्रेसर असल्याचे दिसून आले. एरंडोली येथील सिद्धेश्वर विद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला.प्रज्ञा भरत इथापे 90.60 टक्के गुण मिळवत प्रथम,अंकिता संतोष इथापे 86.40 टक्के गुण मिळवत द्वितीय,तर वैष्णवी संतोष गावडे 85.40 टक्के गुण मिळवत तृतीय आल्याची माहिती मुख्याध्यापक साहेबराव काळे यांनी दिली. निंबवी येथील श्री.भैरवनाथ विद्यालयाचा दहावीचा निकाल 100 टक्के लागला. वैष्णवी विठ्ठल गोंटे 91 टक्के गुण मिळवत प्रथम,प्रीती सुनील भोसले 87.40 टक्के गुण मिळवत द्वितीय, तर स्नेहल संतोष गावडे 87.20 टक्के गुण मिळवत तृतीय आल्याची माहिती मुख्याध्यापक तुकाराम खोसे यांनी दिली.

येवतीच्या श्री खंडेश्वर विद्यालयाचा निकालही 100 टक्के लागला. यात वैष्णवी विठ्ठल दिवटे 82.40 टक्के गुण मिळवत प्रथम,शंभूराज पांडुरंग दिवटे 82.20 टक्के गुण मिळवत द्वितीय,तर प्रणाली संतोष ढवळे 79.80 टक्के गुण मिळवत तृतीय आल्याची माहिती मुख्याध्यापक महादेव शिर्के यांनी दिली. देवदैठणच्या संस्कार ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्सचा 100 टक्के निकाल लागला. यात स्नेहा कैलास घेगडे 88.40 टक्के गुण मिळवून प्रथम आली.तृप्ती गोविंद ढवळे 83.40 टक्के गुण प्राप्त करून द्वितीय, तर तनुजा नवनाथ बनकर 80.20 टक्के गुण मिळवत तृतीय आल्याचे मुख्याध्यापक संजय कौठाळे यांनी सांगितले.

अरणगाव दुमाला येथील श्री.मिरावली विद्यालयाचा दहावीचा निकाल 100 टक्के लागला. यात साकिब करीम शेख 77.80 टक्के गुण मिळवून प्रथम, कावेरी सुरेश शिंदे 68.40 टक्के गुण मिळवून द्वितीय, तर नीलेश राजेंद्र आढाव 66.80 टक्के गुण मिळवून तृतीय आल्याची माहिती मुख्याध्यापक शिवाजी उदार यांनी दिली. कोरेगव्हाणच्या कोरेश्वर विद्यालयचा दहावीचा निकाल 100 टक्के लागला. यात ओम अरुण आढाव 89.40 टक्के गुण मिळवून प्रथम आला.सार्थक राहूल नरोडे 79.20 टक्के गुण मिळवत द्वितीय,तर ओंकार सुनील नरोडे 70 टक्के गुण मिळवुन तृतीय आल्याची माहिती मुख्याध्यापक रमजान सय्यद यांनी दिली.

येळपणे येथील श्री खंडेशवर विद्यालयाचा निकाल 98.80 टक्के लागला. यात शिवम संभाजी शितोळे 95.40 टक्के गुण मिळवत प्रथम,स्नेहल नानासाहेब पवार 92 टक्के गुण मिळवत द्वितीय, तर शुभम संदीप धावडे 90.20 टक्के गुण मिळवत तृतीय आल्याची माहिती मुख्याध्यापक संजय पवार यांनी दिली. देवदैठण येथील श्री संतश्रेष्ठ निंबराज महाराज विद्याधाम प्रशाालेचा निकाल 97.51 टक्के लागला. ओम सुरेश ढवळे 95 .40 टक्के गुण मिळवून प्रथम,जयदीप राहुल वाळुंज 93 .80 टक्के गुण मिळवून द्वितीय, श्रावणी पांडुरंग कौठाळे 92 .60 टक्के गुण मिळवून तृतीय आली. तसेच क्रीडा व चित्रकला विषयांत 54 विद्यार्थ्यांना ग्रेस गुणांचा लाभ मिळाल्याची माहिती मुख्याध्यापक बाळासाहेब दहिफळे यांनी दिली.

राजापूर येथील महात्मा गांधी विद्या मंदिर प्रशालेचा निकाल 95.45 टक्के लागला. कृष्णा बाळू मोरे 73.20 टक्के गुण मिळवत प्रथम,दिव्या संदीप धावडे 71.20 टक्के गुण मिळवत द्वितीय,.तर आनंद हरिभाऊ जगताप 71 टक्के गुण मिळवून तृतीय आल्याची माहिती मुख्याध्यापक दत्तात्रय इथापे यांनी दिली. उक्कडगाव येथील श्री मुंजोबा विद्यालयाचा निकाल 95.34 टक्के लागला. सार्थक विजय कातोरे व कृष्णा सोमनाथ गोलांडे 90. 40 टक्के समान गुण मिळवून संयुक्तरित्या प्रथम आले. प्रतीक तुकाराम कातोरे 89.80 टक्के गुण मिळवून द्वितीय, विराज नितीन बांगर 84.60 टक्के गुण मिळवून तृतीय आल्याची माहिती मुख्याध्यापक भाऊसाहब शितोळे यांनी दिली.

पिंप्री कोलंदर येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील विद्यालयाचा निकाल 92.85 टक्के लागला. यात आकांक्षा राजू कळसकर 88.80 टक्के गुण मिळवत प्रथम,पूजा दत्तात्रय भोंडवे 84 टक्के गुण मिळवत द्वितीय, स्वरांजली वाल्मिक पखालेे 77.80 टक्के गुण मिळवत तृतीय आल्याची माहिती मुख्याध्यापक बाळासाहेब जठार यांनी दिली. म्हसे विद्यालयाचा निकाल 89.79 टक्के लागला. यात समिक्षा खंडेराव पठारे 91.40 टक्के गुण मिळवत प्रथम, तनुजा अप्पा देवीकर 87.20 टक्के गुण मिळवत द्वितीय, तर ज्ञानेश्वरी हनुमंत देविकर 86.40 टक्के गुण मिळवत तृतीय आल्याची माहिती मुख्याध्यापक बिभिषण परकाळे यांनी दिली.

ढवळगाव येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा निकाल 86.95 टक्के लागला. सानिया शब्बीर पठाण 73.40 टक्के गुण मिळवून प्रथम,दीक्षा संभाजी साळुंके 70 टक्के गुण मिळवून द्वितीय,धनश्री आबा बोरगे 67.40 टक्के गुण मिळवत तृतीय आल्याची माहिती मुख्याध्यापक मधुकर सुपेकर यांनी दिली. सारोळा सोमवंशी येथील न्यू इंग्लिश स्कूलचा निकाल 66.66 टक्के लागला. यात दिशा दत्तात्रय आढाव 75.40 टक्के गुण मिळवत प्रथम,आयुष राजेंद्र आढाव 64.20 टक्के गुण मिळवत द्वितीय, ऐश्वर्या सखाराम सकट 63.20 टक्के गुण मिळवत तृतीय आल्याची माहिती मुख्याध्यापक अनिल आढाव यांनी दिली. यशस्वी विदयार्थ्यांचे बाजार समितीचे सभापती अतुल लोखंडे, अहमदनगर जिल्हा खरेदी-विक्री संघाचे संचालक अनिकेत शेळके, कुकडीचे उपाध्यक्ष विवेक पवार, श्रीगोंदा तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक संदीप सोनलकर, मच्छिंद्र वाळके, माजी सभापती मीना देवीकर व गितांजली पाडळे आदींनी अभिनंदन केले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news