राजधानीत राजकीय हालचालींना वेग; नीतीश कुमारांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

राजधानीत राजकीय हालचालींना वेग; नीतीश कुमारांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

पुढारी ऑनलाईन डेस्क : मंगळवारी लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए विरूद्ध काँग्रेसच्या पुढाकाराने विरोधकांनी स्थापन केलेली इंडिया आघाडी यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. भाजप ४०० पार होणार की नाही याची सर्वांनाच उत्सुकता लागली असतानाच दिल्लीतही राजकीय हालचालींना वेग आला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज (दि. ३) नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे.

लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्याच्या एक दिवस आधी नीतीश कुमार यांनी पंतप्रधानांची भेट घेतल्यान राजकीय वर्तुळात सुरू आहे. ७, लोककल्याण मार्गावर पंतप्रधान मोदी आणि नीतीश कुमार यांची भेट झाली आहे.

देशात सात टप्प्यांत लोकसभा निवडणूक पार पडली. १९ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्याच्या मतदानाने ही प्रक्रिया सुरू झाली ती १ जून रोजी सातव्या टप्प्याच्या मतदानाने संपली आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news