पिंपळनेरमध्ये चिमुकले करताहेत सिकलसेल आजाराविषयी जनजागृती

पिंपळनेरमध्ये चिमुकले करताहेत सिकलसेल आजाराविषयी जनजागृती
Published on
Updated on

Sickle cell disease awareness : साक्री तालुक्यातील राईनापाडा येथे जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला.

पिंपळनेर, जि.धुळे : पुढारी वृत्तसेवा – मंत्रालय भारत सरकार व महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सिकलसेल आजार जागरूकता दिवस १९ जून ते ३ जुलै २०२४ या पंधरवड्याच्या निमित्ताने बुधवार (दि.१९) राष्ट्रीय सिकलसेल आजार जागरूकता दिवस साजरा करण्यात येत आहे.

सिकलसेल आजार जनजागृती दिना निमित्ताने शाळेतून परिसरात प्रभात फेरी काढण्यात आली. यामध्ये जनजागृती करत सिकल सेल आजारावर माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष आश्रम शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक विजय खैरनार तर प्रमुख पाहुणे म्हणून आर व्ही पाटील, आरोग्य सेवक प्राथमिक आरोग्य केंद्र रोहड उपस्थित होते.

कार्यक्रमाप्रसंगी आर व्ही पाटील, विज्ञान शिक्षक बालाजी उडतेवार, अधीक्षक पन्नालाल पाटील, अधिक्षिका सोनी सूर्यवंशी, विजय खैरनार यांनी सिकल सेल आजारा बाबतीत जनजागृती सोबतच मार्गदर्शन केले. तसेच आदिवासी बोली भाषेत सिकल सेल निर्मूलन बाबतीत जनजागृती मार्गदर्शन महाळू गांगुर्डे, कैलास बागुल, ज्योती अहिरे, कल्पना बागुल, अनिल चौरे यांनी केले. यावेळी परिसरातील आश्रम शाळेचे प्रवीण भारुडे, सुनील सोनवणे, रोहिदास गवळी, राजू माळचे, लक्ष्मण कांमडे, पिंट्या बागूल, तुळ्या बागुल, मंजू राऊत, डोंगरी माळचे, रंजना माळचे, येसराम चौरे, सापटबाई पवार, सैल्या पवार, सरूबाई पवार, दहिल्या पवार, नंदा सोनवणे आदी परिसरातील माता पालक ग्रामस्थ प्रभात फेरी व जागतिक सिकलसेल दिन समारंभ प्रसंगी उपस्थित होते. राष्ट्रीय सिकलसेल ऍनिमिया निर्मूलन अभियान जागतिक सिकलसेल दिन समारंभ १९ जून ते ३ जुलै २०२४ जनजागृती पंधरवाडा कार्यक्रम प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज बुधवार (दि.१९) पासून प्रारंभ करण्यात आला.

सिकलसेल आजार म्हणजे काय?

प्रत्येक निरोगी व्यक्तीच्या रक्तात लाल रक्तपेशी असतात ज्या आकाराने गोलाकार, मऊ आणि लवचिक असतात. जेव्हा या लाल रक्तपेशी त्यांच्या स्वतःच्या आकारापेक्षा लहान धमन्यांमधून वाहतात तेव्हा त्या अंडाकृती आकाराच्या बनतात. सूक्ष्म धमन्यांमधून बाहेर पडल्यानंतर पेशींच्या लवचिकतेमुळे त्या पुन्हा त्यांचे मूळ स्वरूप धारण करतात. लाल रक्तपेशींचा लाल रंग त्यांच्यामध्ये असलेल्या हिमोग्लोबिन नावाच्या घटकामुळे असतो.

या जनजागृती पंधरवाडा साजरा करताना प्रभात फेरी, सिकलसेल समुपदेशन, जागतिक सिकलसेल दिन समारंभ जनजागृती कार्य मंत्रालय भारत सरकार यांनी सिकलसेल आजाराच्या जनजागृती करिता माहितीपर व्हिडिओ गाव व पाडे वस्तीवर ऐकणे व दाखवणे, सिकलसेल आजारावर जनजागृती पर निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा असे विविध माहितीपर कार्यक्रम  विद्यार्थ्यांसाठी स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे.

आरोग्य विभागामार्फत समुपदेशन व जनजागृती, सिकल सेल तपासणी यासह विविध कार्यक्रम व उपक्रम राष्ट्रीय सिकलसेल ॲनिमिया निर्मूलन अभियान अंतर्गत जनजागृती पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे. या कार्यक्रमासाठी प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी मुख्याध्यापक विजय खैरनार, पन्नालाल पाटील, सोनी सूर्यवंशी, चंद्रकांत साळुंखे, बालाजी उडतेवार, कल्पना बागुल, अनिल चौरे, अशोक कुंवर, कन्हैयालाल परदेशी, मनोज निकम, प्रवीण कुवर, प्रीतम पिंपळे, यशवंत गावीत, उषा अहिरे, मीना गवळी, विजया देसाई, पुष्पा चौधरी, निलेश गवळी यांच्यासह विद्यार्थी पालक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत महाळू गांगुर्डे यांनी सूत्रसंचालन केले. पन्नालाल पाटील यांनी आभार मानले.

या आजाराची लक्षणे काय आहेत?

  • सततचा थकवा
  • हाडांमधील वेदना
  • हात-पायावरील सूज
  • इन्फेक्शन होणे
  • डोळ्यांसंबंधी आजार वाढणे
  • मुलांचा विकास संथ गतीने होणे

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news