दुर्देवी! महिनाभरापूर्वीच मुलगी, पत्नी गेल्यानंतर पिता पुत्राचाही एकाच दिवशी मृत्यू; कुटूंब पडद्याआड

दुर्देवी! महिनाभरापूर्वीच मुलगी, पत्नी गेल्यानंतर पिता पुत्राचाही एकाच दिवशी मृत्यू; कुटूंब पडद्याआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – आजारपणामुळे सोमवारी (दि.१७) वासन नगर परिसरातील पिता पुत्राचा मृत्यू झाला. एकाच दिवशी दोघांचाही मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सुमारे महिनाभरापूर्वी मुलीचा आजारपणामुळे मृत्यू झाला होता. मुलीच्या मृत्यूनंतर आईचाही १३ दिवसांनी मृत्यू झाला. दरम्यान, पिता पुत्राच्या मृत्यूचे कारण स्पष्ट नसल्याने दोघांचेही व्हिसेरा राखून ठेवण्यात आले आहेत.

तुषार अरुण महाजन (३७) व कार्तिक महाजन (१२, दोघे रा. वासन नगर) असे मृत्यू झालेल्य पितापुत्रांची नावे आहेत. महाजन कुटूंबिय सुमारे अडीच वर्षांपूर्वी जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील हिंगोना येथून नाशिक शहरात वास्तव्यास आले होते. तुषार हे एका रुग्णालयात नोकरीस होते. सोमवारी (दि.१७) नातलगांनी घरात तुषार व कार्तिक यांना मृतावस्थेत पाहिले. घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलिस ठाण्याचे पथक तुषार यांच्या घरी गेले. त्यांनी दोघांचेही मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले. पोलिस तपासात कार्तिक यास जुलाब होत असल्याचे समोर आले. तर तुषार हे तणावात असल्याचे समजले. दोघांचेही शवविच्छेदन करण्यात आले असून दोघांचाही व्हिसेरा राखीव ठेवण्यात आला आहे.

महिनाभरात कुटूंबावर घाला

महाजन कुटुंबातील नऊ वर्षीय कन्या हर्षदा हिचा आजारपणामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिच्या मृत्यूने आई स्वाती (३५) या दु:खात होत्या. त्यांना हर्षदाच्या मृत्यूने धक्का बसल्याने आजारी पडल्या. हर्षदाच्या तेराव्याच्या विधीच्या दिवशी स्वाती यांचाही मृत्यू झाला. एकापाठोपाठ दोन धक्के बसल्याने तुषार व कार्तिक हे देखील दु:खात होते. त्यांना धीर देण्यासाठी तुषार यांचा भाचा त्यांच्याकडे राहत होता. मात्र सोमवारी (दि.१७) दोघेही मृतावस्थेत आढळल्याने नातलगांना धक्का बसल आहे. महिनाभरात महाजन कुटूंबावर काळाने घाला घातल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news