Nashik Crime News | अल्पवयीन मुलीशी लग्न; पतीसह सासरच्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Nashik Crime News | अल्पवयीन मुलीशी लग्न; पतीसह सासरच्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

सिडको (नाशिक) : पुढारी वृत्तसेवा – इन्स्टाग्रामवरून ओळख निर्माण करून अल्पवयीन मुलीशी विवाह करून तिला गरोदर केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • इन्स्टाग्रामवरून झाली होती ओळख
  • अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही संबंध ठेवले
  • त्यानंतर विवाह करुन पिडीतेला गरोदर केले.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पीडित विवाहिता ही अंबड परिसरात राहते. आरोपी पतीने पीडितेशी इन्स्टाग्रामवरून ओळख निर्माण केली. ती अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही त्याने दि. १६ ऑगस्ट २०२३ रोजी लग्न केले. त्यानंतर ती गर्भवती राहिली असता, सासू, सासरे, दीर यांनी शिवीगाळ व दमदाटी केली. याप्रकरणी प्रथम अंबड पोलिस ठाण्यात पतीसह सासरच्या चाैघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. नंतर तो इंदिरानगर पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news