Breaking ! युवकाचा दगडाने ठेचून खून; मेरी – रासबिहारी लिंक रोडवरील घटना | पुढारी

Breaking ! युवकाचा दगडाने ठेचून खून; मेरी - रासबिहारी लिंक रोडवरील घटना

पंचवटी (नाशिक): पुढारी वृत्तसेवा – म्हसरूळ पोलिस ठाणे हद्दीतील मेरी – रासबिहारी लिंक रोडवरील औदुंबर लॉन्स जवळील मोकळ्या पटांगणात एका युवकाचा मृतदेह आढळला असून प्रथमदर्शनी दगडाने ठेचून खून केल्याचे समोर येत आहे. प्रशांत अशोक तोडकर, (वय २८, रा. आदर्श नगर, रामवाडी) असे मयताचे नाव असून सदर युवक रिक्षाचालक आहे.

याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, मयत युवक सी बी एस ते म्हसरूळ या मार्गावर रिक्षा चालवत होता. तर शनिवारी (दि.१५) दिवसभर तो घरीच होता. व रात्री घरा बाहेर पडला होता. सदरची घटनेची माहिती सकाळी पोलिसांकडून युवकांच्या घरच्यांना समजली. युवकाचा पश्चात दोन भाऊ, एक बहिण, आई, वडील असा परिवार आहे. या घटनेने परिवार हादरला असून रामवाडी परिसरात शोककळा पसरली आहे. तर म्हसरूळ परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस उपायुक्त डॉ. किरणकुमार चव्हाण, सहायक पोलिस आयुक्त नितीन जाधव, म्हसरूळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुभाष ढवळे व गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी यांनी पाहणी केली असून पोलीस उपायुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट एकचे पोलीस निरीक्षक मधुकर कड व म्हसरूळ पोलिसांनी पुढील तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

हेही वाचा:

Back to top button