पुणे अपघात प्रकरणासंदर्भात अनिल देशमुख यांनी आपल्या 'X' अकाउंटवर ट्वीट करत सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे, " पुणे हिट ॲन्ड रन प्रकरणामध्ये राजकीय दबावाखाली आरोपीचे रक्ताचे नमुने बदलून आरोपी दारू न पिल्याचा अहवाल तयार करण्याचे प्रयत्न झाले, हे उघड झाले आहे. आता माजी गृहमंत्री म्हणुन माझी माहिती अशी आहे की, अपघातात मृत्यू झालेले तरुण आणि तरुणीच्या व्हिसेरा रिपोर्टमध्ये Alcohol +ve यावे याकरिता पूर्णपणे तयारी झाली आहे. जेणेकरुन या प्रकरणामध्ये मृत झालेले मोटरसायकलवरील तरुण आणि तरुणी हे दारु पिऊन होते आणि त्यांच्यामुळेच हा अपघात झाला, असे न्यायालयात सिद्ध करता येईल. जेणेकरून विशाल अग्रवालचा मुलगा लवकर सुटेल, अशा पध्दतीने प्रयत्न सध्या सरु आहेत." ( Porsche accident case )