[author title="गंगापूर रोड : आनंद बोरा" image="http://"][/author]
वाळवी.. लाकडाचा भुगा करणारी, झाडांना मारणारी इतकीच तिची ओळख.. पण वाळवीचे (Termites) एक वेगळे विश्व आहे. पावसाळ्यात हवेत शेकडोने ज्या पाकोळ्या दिसतात, त्या वाळवी असतात. त्यांच जमिनीखालील विश्वाची एक चमत्कारी जीवनचक्र आहे. पहिल्या पावसात हे अगदी जवळून पाहता येते.
वर्षभर जमिनीखाली साम्राज्य चालविणार्या वाळवीचे (Termites) एक हटके साम्राज्य आहे. पाऊस पडला की या कीटकांना निसर्ग क्षणभरासाठी पंख देतो. त्या पटापट जमिनीतून बाहेर यायला लागतात आणि उंच उंच उडू लागतात. एका वेळेस हजारो पाकोळ्या बाहेर पडतात. या वाळवी पंखासह उंच उंच भरारी घेत हळूहळू जमिनीकडे येऊ लागतात. यातील मादी पाने, फांद्यावर उलट्या लटकलेल्या दिसतात. त्यांना पाहिल्यानंतर त्या फांद्यात अडकल्या असतील असे वाटते पण बारीक निरीक्षण केल्यावर या माद्या नराला आकर्षित करण्यासाठी उलट्या लटकून पंखांनी फडफड करून एक द्रव सोडत असतात असे दिसते. या द्रवाला आकर्षित होऊन नर जवळ येतात व आपल्या साथीदाराची निवड करतात आणि त्यांचे मिलन होते. जमिनीवर आल्यावर क्षणभरासाठी फुटलेले पंख सोडून त्या जमिनीच्या आत आपल्या विश्वात पुन्हा निघून जातात ही जोडी वर्षभर एकत्र राहते व पुढील वर्षी परत नवा साथीदार त्या शोधत असतात. निसर्गाने या वाळवींना पहिल्या पावसात बाहेर येण्याचा निसर्गनियम दिल्याने जमिनीत हजारो संख्येने तयार झालेल्या वाळवींना नियंत्रण आणण्यासाठी उपायदेखील केला आहे. ज्यावेळी या बाहेर येतात त्यावेळी असंख्य पक्ष्यांचा हा विणीचा हंगाम असतो. पिल्ले घरट्यात असतात. यांना अन्नाची गरज असते तसेच वाळवी (Termites) इतक्या संख्येने जमिनीत राहिली तर वृक्ष राहणार नाही, की आपले घरातील फर्निचरदेखील. यासाठी या पाकोळ्यांना क्षणभरासाठी पंख दिले गेले जेव्हा ते हवेत उंच उडू लागतात त्यावेळी ते पक्षी, सरडे, बेडूक, पाली आदी जीवांचे खाद्य बनते. यामुळे त्यांची संख्या नियंत्रित राहते
लोट- स्वार्म- स्वार्म म्हणजे एक प्रकारच्या कीटकांचा समूह असतो. वाळवीचे स्वार्म खुल्या आणि संरक्षित वातावरणातदेखील तयार होतात. पावसाळा हा प्रेमाचा ऋतू मानला जातो. वाळवीचा स्वार्म म्हणजे आपल्या प्रेमी जोडीदराच्या शोधात उडणारा वाळवीचा समूह. नर आणि मादी एकमेकांना शोधण्यासाठी विशिष्ट असा रासायनिक गंध सोडतात आणि एकत्र येतात.
हेही वाचा: