जळगाव : पाटचारीतील पाण्यात पडल्याने तरूणाचा बुडून मृत्यू | पुढारी

जळगाव : पाटचारीतील पाण्यात पडल्याने तरूणाचा बुडून मृत्यू

जळगाव : पुढारी वृत्तसेवा – भुसावळ तालुक्यातील साक्री शिवारातील शेतातील पाटचारीत ३५ वर्षीय तरूण पाण्यात पडल्याने मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवार (दि.१०) रोजी उघडकीस आली आहे. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक असे की, निवृत्ती खरात (35) हा तरूण परिवारासह भुसावळ तालुक्यातील साक्री गावात वास्तव्याला होता. शेतीचे काम करून उदरनिर्वाह करत होता. त्याने गावातील प्रकाश दामू कोल्हे यांचे शेत कसायला घेतले होते. दरम्यान सोमवार (दि.१०) रोजी सकाळी ८ वाजता शेताजवळ असलेल्या पाटचारीतील पाण्यात पडल्याने निवृत्ती खरात याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. घटना समजताच स्थानिक शेतकऱ्यांनी धाव घेत निवृत्ती यास पाण्याबाहेर काढले. तत्काळ भुसावळ ट्रामा केअर सेंटर येथे दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले आहे. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पुजा अंधारे या करीत आहेत.

हेही वाचा:

Back to top button