Stock Market Closing Bell : सेन्सेक्समध्‍ये ‘अल्‍प’ घसरण, आज ‘हे’ शेअर्स राहिले टॉप गेनर्स

प्रातिनिधिक छायाचित्र.
प्रातिनिधिक छायाचित्र.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : जागतिक बाजारपेठेत सकारात्‍मक परिस्‍थिती असतानाही आज ( दि.११) देशांतर्गत शेअर बाजारातील व्यवहार चढ-उताराचे राहिले. ओएनजीसीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी दिसून आली, अखेर आज व्‍यवहार बंद होताना सेन्सेक्स 33 अंकांनी घसरला आणि 76,400 च्या वर बंद झाला तर निफ्टी 5 अंकांनी वाढून 23,264 वर बंद झाला.

आज शेअर बाजारात काय घडलं?

    • वरच्या स्तरावरून घसरल्यानंतर बाजार सपाट बंद झाले
    • निफ्टी 5 अंकांनी वाढून 23,264 वर बंद
    • सेन्सेक्स 33 अंकांनी घसरला आणि 76,456 वर बंद
    • निफ्टी बँक 75 अंकांनी घसरून 49,705 वर बंद झाला.

सुरुवातीला 'सावध' चाल, घसरणीनंतर सावरला बाजार

देशांतर्गत शेअर बाजाराने आज ( दि.११) सावध सुरुवात केली. सेन्सेक्स-निफ्टी किंचित घसरणीसह उघडले. सेन्सेक्स जवळपास 80 अंकांनी घसरला आणि 76,400 च्या वर उघडला. निफ्टी सुमारे 15 अंकांनी घसरून 23,245 च्या आसपास उघडला आणि बँक निफ्टी 200 अंकांच्या घसरणीसह 49,800 च्या वर उघडला. बँक निफ्टी जवळपास 200 अंकांनी घसरला होता. बँकिंग शेअर्सवर दबाव दिसून आला. ओएनजीसी, आयआरसीटीसी, बीईएल सारख्या शेअर्समध्ये वाढ दिसली. मात्र, त्यानंतर बाजारात सावरला, सेन्सेक्स 370 अंकांनी वाढला तर निफ्टीही 100 हून अधिक अंकांनी वधारला. दुपारी तीनच्या सुमारास सेन्सेक्स 196.10 अंकांनी किंवा 0.25 टक्क्यांनी वाढून 76,682.48 वर व्यवहार करत होता. निफ्टी 71.90 अंकांनी किंवा 0.31 टक्क्यांनी वाढून 23,331.10 वर दिसला. या कालावधीत अंदाजे 2250 शेअर्स वाढले. तर 1173 शेअर्समध्ये घसरण दिसून आली. 74 शेअर्समध्‍ये कोणताही बदल झाला नाही.

'या' शेअर्संनी अनुभवली तेजी

आजच्‍या व्‍यवहारात ओएनजीसी, एनटीपीसी, अपोलो हॉस्‍पिटल्‍स, पॉवर ग्रिड आणि कोल इंडिया हे निफ्‍टीमध्‍ये मोठे नफा मिळविणारे शेअर्स ठरले तर बीपीसीएल, डॉ. रेड्डीज लॅब, आयसीआयसीआय बॅक, कोटक महिंद्रा बँक, , एसबीआय लाइफ इन्शुरन्स आणि श्रीराम फायनान्स निफ्टी 50 मध्ये प्रमुख पिछाडीवर होते.  बँक, एफएमसीजी, हेल्थकेअर आणि धातूच्या शेअर्समध्ये विक्री दिसून आली. BSE मिडकॅप निर्देशांक 0.7 टक्क्यांनी वाढून बंद झाला. तर स्मॉलकॅप निर्देशांक जवळपास 1 टक्क्यांनी वाढून बंद झाला

पेट्रोलियम मंत्री पुरींच्‍या स्‍पष्‍टोक्‍तीनंतर 'बीपीसीएल' वाढ

बीपीसीएलचे निर्गुंतवणूक करण्याचा कोणताही विचार नाही, पेट्रोल डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. बीपीसीएलचेशेअर NSE वर 5.95 पॉइंट्स किंवा 0.99 टक्क्यांच्या वाढीसह व्‍यवहार करताना दिसला. बीपीसीएलच्या शेअर्समध्ये 1 आठवड्यात 5.14 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

रेल्‍वेमंत्री पदी पुन्‍हा वैष्णव, रेल्वे शेअर्स 'सुसाट'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्‍यांच्‍या तिसर्‍या कार्यकाळात रेल्‍वे मंत्री पदाची धुरा अश्‍विनी वैष्‍णव यांच्‍याकडे कायम ठेवली आहे. आज त्‍यांनी आपल्‍या पदाचा कार्यभार स्‍वीकारला. आज धोरण स्थिरतेच्या अपेक्षेने रेल्वेशी संबंधित कंपन्यांच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ दिसून आली. IRCON इंटरनॅशनलचे शेअर्स आज सुमारे 9 टक्क्यांनी वाढले. RailTel च्या शेअर्समध्ये सुमारे 11 टक्क्यांची उसळी दिसून आली. RVNL चे शेअर्स देखील 4 टक्क्यांहून अधिक वाढले. रेल्वे फायनान्सर इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पचे शेअर्सही जवळपास तीन टक्क्यांनी वाढले. गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला 4 जून रोजी रेल्वे कंपन्यांचे शेअर्स सात टक्क्यांपर्यंत घसरले होते. निवडणुकीचे निकाल एक्झिट पोलपेक्षा वेगळे असल्याने गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात विक्री केली होती. आता वैष्णव यांना रेल्वे मंत्री म्हणून कायम ठेवण्यात आले आहे, गुंतवणूकदारांनी पुन्‍हा रेल्‍वेला पसंती दिल्‍याचे आज दिसले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news