Good News ! मान्सून येत्या 48 तासांत राज्यात; आज कर्नाटक,आंध्र प्रदेशात प्रवेश

Good News ! मान्सून येत्या 48 तासांत राज्यात; आज कर्नाटक,आंध्र प्रदेशात प्रवेश

पुणे : पुढारी वृत्तसेवा : केरळमध्ये अडखळलेला मान्सून रविवारी कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात दाखल झाला. पश्चिमी वार्‍यांनी वेग घेतल्याने तो तळकोकणासह पुणे, मुंबई बहुतांश भागात आगामी 48 ते 72 तासांत येऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. केरळमध्ये मान्सून यंदा 30 मे रोजीच दाखल झाला. मात्र 48 तास तो तेथेच अडखळला होता. रविवारी त्याने गती घेतली आणि कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशातील काही भाग व्यापला.

तसेच अरबी समुद्रासह ईशान्य भारतात त्याची प्रगती सुरू आहे. उत्तर भारतात अजून दोन ते तीन दिवस उष्मा राहील. त्यानंतर वेगाने मान्सून बिहारमध्ये दाखल होताच उष्णतेची लाट कमी होण्याचा अंदाज आहे. पश्चिमी वार्‍यांनी वेग घेतल्याने राज्यात वेळेवर हवामान शास्त्रज्ञांच्या मते रविवारी पश्चिमी वार्‍यांनी वेग घेतला. त्याने तीन राज्ये एकाच दिवसात काबीज केली. त्यामुळे तो महाराष्ट्रात आगामी दोन ते तीन दिवसांत म्हणजे 48 ते 72 तासांत दाखल होऊ शकतो.

राज्याचे कमाल तापमान..

ब्रह्मपुरी 46.5, चंद्रपूर 45, गोंदिया 44.9, नागपूर 45.4, वाशिम 42.6, वर्धा 46, यवतमाळ 44.5, मुंबई 35.1, पुणे 37.2, अहमदनगर 40.2, जळगाव 40.9, कोल्हापूर 34.2, महाबळेश्वर 28.7, मालेगाव 42.6,नाशिक 36.5, सांगली 36.4, सातारा 35.9, सोलापूर 40.2, धाराशिव 39.2, छत्रपती संभाजीनगर 40, परभणी 42.2, नांदेड 40.2, अकोला 43.5, अमरावती 44.6, बुलडाणा 38.8.

पश्चिमी वाऱ्यांनी रविवारपासून वेग घेतल्याने मान्सून आता महाराष्ट्राच्या दिशेने निघाला आहे. आगामी 48 ते 72 तासांत तो तळकोकणासह राज्यातील काही भाग व्यापण्याची शक्यता आहे. सोमवार दि.3 जूनपासून राज्यात सर्वत्र मान्सून पूर्व पावसाला सुरुवात होणार आहे. त्यातच मान्सून दाखल होईल.

– डॉ. अनुपम कश्यपी, निवृत्त हवामान विभागप्रमुख, पुणे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news