Rohit Pawar Vs Navneet Rana| पाणी टंचाईच्या फेऱ्यातून महिलांची सुटका कधी? रोहित पवारांचा नवनीत राणांना सवाल | पुढारी

Rohit Pawar Vs Navneet Rana| पाणी टंचाईच्या फेऱ्यातून महिलांची सुटका कधी? रोहित पवारांचा नवनीत राणांना सवाल

पुढारी ऑनलाईन डेस्क: पाणी टंचाईच्या फेऱ्यातून महिलांची सुटका कधी? असा सवाल अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना आमदार रोहित पवार यांनी केला आहे. या संदर्भातील एक्स व्हिडिओ आणि पोस्ट आमदार रोहित पवार (Rohit Pawar Vs Navneet Rana) यांनी केली आहे.

रोहित पवार यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, निवडणुकीच्या प्रचारात महिलांना पैसे वाटले. त्यावेळी ते पाणी वाटल्याचे पैसे असल्याचा दावा अमरावतीच्या खासदार महोदयांनी केला होता. आज या महिला आणि चिमुकल्यांना पैसे नाही तर पाण्याची गरज आहे, असे देखील रोहित पवार (Rohit Pawar Vs Navneet Rana) यांनी म्हटले आहे.

खासदार महोदया होळीला या महिलांसोबत फेर धरतात. पण पाणी टंचाईच्या या फेऱ्यातून त्यांची सुटका कधी होणार आहे. यातून येथील महिलांची सुटका होण्यासाठी माझ्या मतदारसंघाप्रमाणे लोकांच्या घरापर्यंत पाणी पोचवणार का? असा सवाल देखील रोहित पवार यांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा (Rohit Pawar Vs Navneet Rana) यांना केला आहे.

हेही वाचा:

Back to top button