जळगाव : महाराष्ट्र राज्य सरचिटणीस पदी सरफराज तडवी यांची नियुक्ती | पुढारी

जळगाव : महाराष्ट्र राज्य सरचिटणीस पदी सरफराज तडवी यांची नियुक्ती

जळगाव : पुढारी वृत्तसेवा – शासकीय पदवीधर क्ष किरण वैज्ञानिक अधिकारी संघटनेच्या महाराष्ट्र राज्य सरचिटणीस पदी सरफराज तडवी ( भैया ) यांची निवड नुकतीच झाली आहे.

भुसावळ येथील तथा सामान्य रुग्णालय जळगाव चे क्ष किरण वैज्ञानिक अधिकारी सरफराज सिकंदर तडवी ( भैया ) यांची शासकीय पदवीधर क्ष किरण वैज्ञानिक अधिकारी महाराष्ट्र राज्य संघटनेच्या सरचिटणीस पदी यांची औरंगाबाद येथील कार्यक्रमात निवड करण्यात आली आहे.

मुळात सरफराज तडवी उर्फ भैया यांना महाविद्यालयीन शिक्षणाच्या काळा पासूनच सामाजिक कामाची आवड आहे, परंतु शासकीय सेवेत असल्यामुळे त्यांना काही मर्यादा असल्याकारणाने त्यांनी वैद्यकिय सेवेत सुध्धा समाजकार्य करता येतं हे दाखवून दिले. त्यांच्यातील सामाजिक काम करण्याची जिद्द पाहून थेट राज्ये पातळीवर संघटनेच्या माध्यमातून काम करण्याची संधी त्यांना मिळाली. त्यांच्या या निवडी बद्दल खास करून वैद्यकिय क्षेत्रात प्रथमच हा मान जळगाव जिल्ह्यात मिळाल्याने त्याचे सर्वत्र कौतुक ,अभिनंदन होत आहे.

हेही वाचा:

Back to top button