Nashik Crime | मुंढेगाव येथे विहिरीत आढळला मायलेकीचा मृतदेह | पुढारी

Nashik Crime | मुंढेगाव येथे विहिरीत आढळला मायलेकीचा मृतदेह

इगतपुरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा – तालुक्यातील मुंढेगाव येथील जिंदाल कंपनीजवळील शासकीय आश्रमशाळेच्या परिसरातील विहिरीत २३ वर्षीय विवाहित महिला आणि तिच्या ३ वर्षीय मुलीचा मृतदेह आढळला आहे. प्रियंका नवनाथ दराणे (२३) व वेदश्री नवनाथ दराणे ( ३) असे दुर्दैवी मायलेकीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघी मायलेकी जवळच असलेल्या शेणवड खुर्द येथील रहिवासी आहेत. विहिरीला कठडा नसल्याने बालिका विहिरीत पडल्याने तिला वाचवण्यासाठी आईने धाव घेऊन उडी मारली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेत दोघींचाही मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.

हेही वाचा:

Back to top button