मान्सूनचा अंदमान, निकोबार बेटांवर मुक्काम; मान्सून लवकरच केरळमध्ये पोहचणार

मान्सूनचा अंदमान, निकोबार बेटांवर मुक्काम; मान्सून लवकरच केरळमध्ये पोहचणार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : अनुकूल आणि पोषक वातावरणामुळे मान्सूनने वेगाने आगेकूच केली. बुधवारी (दि. 22) मान्सूनने अंदमान, निकोबार बेटांसह मालदीवचा काही भाग, कोमोरीन, बंगालच्या उपसागरातील दक्षिण भाग व्यापला आहे. दरम्यान, पुढील 48 तासांत अंदमान, निकोबार बेटांच्या उर्वरित भागासह अंदमान समुद्र, बंगालच्या उपसागरातील मध्यभागासह इतर भागांत मानसून पोहचेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 19 मे रोजी मान्सून बंगालच्या उपसागरासह अंदमान, निकोबार बेटांकडे दाखल झाला. त्यानंतर त्याच्या अनुकूल आणि पोषक वातावरणामुळे अंदमान आणि निकोबारचा संपूर्ण भाग व्यापला आहे. आता त्याची पुढील वाटचाल सुरू झाली आहे.

दरम्यान, 31 मेपर्यंत मान्सून केरळमध्ये पोहचण्याची दाट शक्यता आहे. यामुळे पुढील प्रवास होणे शक्य होणार आहे. सध्या दक्षिण केरळच्या भागात चक्रीय स्थिती कार्यरत आहे. याशिवाय बंगालचा मध्य-पूर्व भाग ते उत्तर तामिळनाडू ते दक्षिण कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा कार्यरत आहे. 24 मेपर्यंत या कमी दाबाच्या पट्ट्याचे रूपांतर तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात होणार आहे. या स्थितीमुळे मान्सून पुढे सरकण्यास मदत होणार आहे. 25 मे रोजी मान्सून बंगालच्या उपसागरातील ईशान्य भागाकडे सरकणार आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news