Kshitij Zarapkar: अभिनेते क्षितीज झारापकर यांचे कर्करोगाने निधन | पुढारी

Kshitij Zarapkar: अभिनेते क्षितीज झारापकर यांचे कर्करोगाने निधन

पुढारी ऑनलाईन डेस्क: मराठी अभिनेता क्षितीज झारापकर यांचे आज (दि.५) सकाळी कर्करोगामुळे निधन झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून ते कर्करोगाचा सामना करत होते. आज सकाळी हदयविकाराचा झटका येऊन वयाच्या ५४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यामुळे मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांचे (Kshitij Zarapkar) पार्थिक अंत्यदर्शनासाठी दादर शिवाजी पार्क येथील घरी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी ३.३० वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. (Kshitij Zarapkar)

अभिनेते क्षितीज झारापकर यांनी एकुलती एक, आयडियाची कल्पना, गोळाबेरीज, ठेंगा, यांसारख्या सिनेमांत काम केले आहे. यापूर्वी अभिनेते क्षितीज झारापकर हे आस्ताद काळे आणि अदिती सारंगधर यांच्या नाटकातूनही (Kshitij Zarapkar) प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. (Kshitij Zarapkar)

हेही वाचा:

Back to top button