पिंपळनेर : साक्रीची चैताली पवार राष्ट्रीय एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित | पुढारी

पिंपळनेर : साक्रीची चैताली पवार राष्ट्रीय एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित

पिंपळनेर,जि.धुळे : पुढारी वृत्तसेवा
साक्री तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील चिंचपाडा या छोट्याशा आदिवासी पाड्यातील छोटू झिपरू पवार यांची कन्या चैताली छोटू पवार हिला दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ, नाशिकचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. महेंद्र देशपांडे यांच्यातर्फे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पुरस्कार pudhari.news

चैताली छोटू पवार हिने शालेय उपक्रमासह आदिवासी समाजातील विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आदिवासी समाजामध्ये  व्याख्यानाद्वारे प्रबोधन करून समाजकार्य केले. यामुळे नॅशनल एक्सलन्स ऍवॉर्ड-2024 ने सापुतारा येथील हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष उपेंद्रभाई पटेल, अरविंद सोनवणे, डॉ. आशाताई पाटील, अमोल शिंदे, डॉ. लालबहादूर राणा, मयूर रत्नपारखी, पूजा जैन, प्रमोद कुलकर्णी, प्रदीप हरसोरा यांच्या उपस्थितीत चैतालीला गौरविण्यात आले. चैताली पवारला पुरस्कार मिळाल्याबद्दल पंचायत समिती सदस्य संगीता गावित, गणेश गावित, तानाजी बहिरम, प्रेमचंद सोनवणे, मन्साराम भोये, पुष्पा चौधरी, अजय राऊत, संदीप भोये यांनी चैतालीचे कौतुक केले.

हेही वाचा:

Back to top button