नाशिक : शहरातील १९७ बेशिस्त चालकांवर दंडात्मक कारवाई | पुढारी

नाशिक : शहरातील १९७ बेशिस्त चालकांवर दंडात्मक कारवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहर वाहतूक पोलिसांनी बेशिस्त चालकांवर कारवाईची विशेष मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार नो पार्किंगमध्ये वाहने उभी करणाऱ्या चालकांवर वाहतूक विभागाने कारवाई केली. त्यात १९७ जणांना दंड ठोठावण्यात आला. या कारवाईमुळे बेशिस्त वाहनचालकांचे धाबे दणाणले आहे.

शहर पोलिस आयुक्तालयात सुमारे दोन वर्षांपासून टोइंग कारवाई बंद झाली असून, त्याचा गैरफायदा बेशिस्त वाहनचालकांनी घेतला आहे. नो पार्किंगच्या ठिकाणी सर्रास वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा आणतात. त्यामुळे शहरातील वाहतुकीचा खोळंबा होत आहे. त्याचा इतर वाहनचालकांना त्रास सहन करावा लागतो. तसेच, सातत्याने अपघातांचे प्रकारही वाढत आहेत. यात अपघाती मृत्यू व जखमींचे प्रमाण चिंताजनक आहे. यासंदर्भात शहर वाहतूक शाखेच्या चारही विभागांत बेशिस्त वाहनांसह नो-पार्किंगमधील वाहनांविरोधात दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी चारही विभागांत केलेल्या कारवाईतून नो-पार्किंगच्या १९७ केसेस दाखल करीत ९८ हजार ५०० रुपयांचा दंड ई-चलानद्वारे आकारला आहे.

याठिकाणी झाली कारवाई
– त्र्यंबक नाका ते मेहेर सिग्नल स्मार्ट रोड
– होळकर पूल
– शरणपूर रोड
– मुंबई नाका ते द्वारका
– बिटको चौक
– जेलरोड
– कॉलेज रोड

हेही वाचा:

Back to top button