मुंबईत धावतेय; पुण्यात डबल डेकर बस कधी? पुणेकर प्रवाशांचा सवाल

मुंबईत धावतेय; पुण्यात डबल डेकर बस कधी? पुणेकर प्रवाशांचा सवाल
Published on
Updated on
पुणे : पीएमपी प्रशासनाने पुण्यात डबल डेकर बस आणण्याचे योजिले आहे. त्या पुण्यात कधीपर्यंत येणार? त्यातून आम्हाला कधीपासून प्रवास करता येणार? मुंबईप्रमाणे पुण्यात डबल डेकर बस नक्की येणार का? असे असंख्य प्रश्न पुणेकरांकडून प्रशासनाला विचारले जात आहेत. त्याचे उत्तर प्रशासनाने कृतीतून द्यावे, अशी अपेक्षा पुणेकरांकडून व्यक्त केली जात आहे.

आता चेंडू दोन्ही महापालिकांच्या कोर्टात

तत्कालीन अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पीएमपी संचालक मंडळाच्या बैठकीत डबल डेकर बस खरेदीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे डबल डेकर खरेदीला अखेर ग्रीन सिग्नल मिळाला आहे. या वेळी झालेल्या बैठकीत दोन्ही मनपा आयुक्तांसह पीएमपीचे संचालक उपस्थित होते. मात्र, आता दोन्ही महापालिकांनी एकत्रित पावले उचलून निधी देऊन डबल डेकर पुण्यात धावण्याचे पुणेकर प्रवाशांचे स्वप्न पूर्ण करावे, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

…तर अशी अवस्था नको

पुणे शहराच्या भौगोलिक स्थितीचा आणि प्रवासीहिताचा प्रशासनाला विचार करावा लागणार आहे. या बसमुळे शहरात वाहतूक कोंडीसारख्या समस्या उद्भवणार आहेत. या बस शहरातील अरुंद रस्त्यांवर धावणार नाहीत. त्याबरोबरच या बसच्या किमती जास्त असणार आहेत. एका डबल डेकर बसमध्ये 2 ते 3 सीएनजी बसची खरेदी होऊ शकते. डबल डेकर इलेक्ट्रिक असल्याने त्यांना चार्जिंगसाठी तासन् तास वेळ लागणार आहे. तसेच, ई-गाड्यांच्या बॅटर्‍या सध्याच्या घडीला लगेचच उतरत आहेत. त्यामुळे या बस नकोत; अन्यथा सदरच्या बस यापूर्वी पीएमपीने ताफ्यात आणलेल्या जुन्या लाल रंगाच्या व्होल्वो बसप्रमाणे पांढरा हत्ती ठरतील, असे मत पीएमपीच्या तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.

डबल डेकरचे फायदे?

  • नवीन येणारी
  • डबल डेकर बस
  • इलेक्ट्रिक असणार
  • इलेक्ट्रिकमुळे
  • शहरातील प्रदूषण
  • रोखण्यास मदत
  • इंधनाची बचत होणार
  • एसीमुळे थंडगार प्रवास होणार
  • एकाच बसमधून दोन बसच्या क्षमतेच्या प्रवाशांची वाहतूक शक्य
  • उत्पन्नात होणार वाढ
  • प्रवाशांचे थांब्यांवरील
  • वेटिंग कमी होणार
  • नव्या 12 मीटर लांबीच्या बसची खरेदी कमी होणार
  • शहराच्या विकासात भर पडणार

डबल डेकरचे असे होणार वाटप

  • पुणे हद्दीत – 12 डबल डेकर बस धावणार
  • पिंपरी-चिंचवड हद्दीत 8 बस धावणार

या मार्गांवर  धावणार बस

  • भोसरी-निगडी
  • मनपा-बाणेर
  • कात्रज-हडपसर
  • कात्रज-हिंजवडी (प्रस्तावित)
मुंबईप्रमाणे पुणे शहराचा देखील विकास व्हायला हवा, त्यासाठी पीएमपी प्रशासनाने वाहतुकीसाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा पुरविणे गरजेचे आहे. गाड्यांसाठी आमच्यासारख्या प्रवाशांना सातत्याने वाट पाहावी लागत आहे. डबल डेकर बसमुळे एकाच बसमधून दोन बसच्या क्षमतेच्या प्रवाशांची वाहतूक होऊ शकते. त्यामुळे नवीन डबल डेकर बस लवकरात लवकर शहरात याव्यात.
– रवींद्र मेंगडे, प्रवासी

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news