जळगाव : महानिर्मितीच्या तीन दिवसीय आंतर विद्युत केंद्र आंतरगृह क्रीडास्पर्धेचे उद्घाटन | पुढारी

जळगाव : महानिर्मितीच्या तीन दिवसीय आंतर विद्युत केंद्र आंतरगृह क्रीडास्पर्धेचे उद्घाटन

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र येथे महानिर्मितीच्या तीन दिवसीय आंतर विद्युत निर्मिती केंद्र राज्यस्तरीय आंतरगृह क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन शनिवार (दि.६) रोजी दीपनगर वसाहत येथे मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आंतरगृह क्रीडा समितीचे अध्यक्ष तथा मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांनी भुषविले.

याप्रसंगी मंचावर उपमुख्य अभियंता सर्वश्री अशोक भगत, रविंद्र सोनकुसरे, संतोष वकारे, भानुदास लाडवंजारी, विलास हिरे- उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी, रविंद्र डांगे-अधिक्षक अभियंता प्रामुख्याने उपस्थित होते. मान्यवरांचे खुल्या जिपमधून ढोल पथकासोबत नवीन मनोरंजन केंद्र येथे आगमन झाल्यानंतर विविध विद्युत केंद्रातील एकूण ११ संघांनी बॅण्डपथकाच्या तालावर मान्यवरांना मानवंदना दिली. यानंतर महानिर्मिती ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. सोबत महानिर्मितीचे गीत सादर करण्यात आले. याप्रसंगी विविध रंगीत फुगे आकाशात सोडण्यात आले त्याचबरोबर मान्यवरांनी क्रीडास्पर्धेचे उद्घाटन झाल्याचे जाहीर केले.

यानंतर भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र येथील राष्ट्रीय पातळीवरील नामांकीत खेळाडू यांनी रिले पध्दतीने क्रीडाज्योत मैदानात आणली. त्यानंतर मुख्य क्रीडा ज्योतीचे मान्यवरांचे हस्ते प्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी पुरुषोत्तम वारजूरकर मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी, सर्व उपमुख्य अभियंते, सर्व अधीक्षक अभियंते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुरुषोत्तम वारजुरकर, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष व उदघाटक मोहन आव्हाड, मुख्य अभियंता तथा अध्यक्ष-क्रीडा स्पर्धा आयोजन समिती यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, खेळामुळे कामामध्ये ऊर्जा निर्माण होऊन महानिर्मिती वीज उत्पादनात आणखी उंच पल्ला गाठता येणार आहे. तसेच सांघिक भावना जोपासून खिलाडु वृत्तीचे प्रदर्शन करण्याचे त्यांनी आवाहन केले. त्यानंतर संघ व्यवस्थापक व कल्याण अधिकारी यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. महेश मुंडे आणि पंकज सनेर यांनी सूत्र संचलन केले. मुकेश मेश्राम, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी तथा सचिव-क्रिडा स्पर्धा आयोजन समिती यांनी आभार मानले. याप्रसंगी विविध संघटना, पत्रकार, अधिकारी-कर्मचारी, विभाग प्रमुख, कंत्राटदार आणि कंत्राटी कामगार आणि वसाहतवासी मोठया संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा:

Back to top button