पुढारी ऑनलाईन डेस्क : जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती (World's oldest man) म्हणून इंग्लंडमधील १११ वर्षीय जॉन आल्फ्रेड टिनिसवूड यांच्या नावाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. त्यांना नुकतेच गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने प्रमाणपत्रही प्रदान केले आहे. त्यांनी आपल्या दीर्घायुष्याचे रहस्य सांगितले आहे.
जॉन आल्फ्रेड टिनिसवूड यांचा जन्म 26 ऑगस्ट 1912 रोजी लिव्हरपूल येथे टायटॅनिक बुडाल्यानंतर काही महिन्यांनंतर झाला. त्यांनी दोन महायुद्धांत लष्करात सेवा बजावली आहे. दुसऱ्या महायुद्धात ब्रिटीश आर्मी पे कॉर्प्समध्येही त्यांनी सेवा बजावली हाेती.
जॉन आल्फ्रेड टिनिसवूड दीर्घायुष्याचे रहस्य सांगताना म्हणतात की, संयम हीच निरोगी जीवनाची गुरुकिल्ली आहे. मी कधीही धूम्रपान केले नाही. आठवड्यातून एकदा मासे ( फिश) आणि चिप सपर व्यतिरिक्त कोणताही विशेष आहार घेत नाही. तुम्ही सारखच खात किंवा पित राहिला तर तुम्हाला शेवटी तुमच्या शरीराला त्याचा त्रास होईल, असे टिनिसवुड यांनी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बूकशी बोलताना सांगितले. दीर्घायुष्यी होणे हे नशीबही आहे. तुम्ही एकतर दीर्घायुष्य जगता किंवा तुम्ही कमी जगता. मात्र हे तुमच्या हाती नसते, असेही ते नम्रपणे नमूद करतात.
याच महिन्यात व्हेनेझुएला येथील सर्वात वृद्ध व्यक्ती जुआन व्हिसेंट पेरेझ यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन झाले आहे. जगातील सर्वात वृद्ध महिला आणि सर्वात वृद्ध व्यक्ती स्पेन येथील117 वर्षीय मारिया ब्रान्यास मोरेरा या आहेत.
हेही वाचा :