Sanjay Nirupam : ‘राहुल गांधींना डाव्यांचा गराडा’; संजय निरुपम यांचे टीकास्त्र | पुढारी

Sanjay Nirupam : 'राहुल गांधींना डाव्यांचा गराडा'; संजय निरुपम यांचे टीकास्त्र

पुढारी ऑनलाईन डेस्क: “राहुल गांधींना डाव्या पक्षाची नेत्यांना घेरले आहे. काँग्रेस पक्षाची विचारधारा ही नेहरूंच्या धर्मनिरपेक्षतेवरच आधारित होती. ही विचारधारा राहुल गांधी यांनी सोडली आहे”, अशी टीका संजय निरुपम (Sanjay Nirupam) आज (दि.४ ) पत्रकार परिषदेत केली.

काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांची बुधवारी (दि.३) पक्षातून हकालपट्टी करण्यात आली हाेती. आज आपली भूमिका मांडताना संजय निरुपम म्‍हणाले की, काँग्रेस पक्ष हा पूर्णपणे विखुरलेला पक्ष आहे. पक्षाच्या अनेक नेत्यांनीही काँग्रेसची विचारधारा दिशाहीन आहे. (Sanjay Nirupam)

काँग्रेस पक्षात पाच सत्ताकेंद्रे: संजय निरुपम

पूर्वी काँग्रेस पक्षात एकच सत्ताकेंद्र असायचे. पण आता काँग्रेस पक्षात पाच सत्ताकेंद्रे आहेत. या पाचही लॉबींचा आपापसात संघर्ष सुरू आहे. या पाच केंद्रांमध्ये, पहिले सोनिया गांधी, दुसरे राहुल गांधी, तिसरे प्रियंका गांधी-वड्रा, चौथे मल्लिकार्जुन खर्गे आणि शेवटचे काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल हे सर्व आपापल्या परीने राजकारण करत आहेत, असे देखील संजय निरुपम यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

पक्ष हकालपट्टीनंतर संजय निरुपम यांच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा

काँग्रेसचे संजय निरुपण यांची हकालपट्टी केल्यानंतर पक्षाने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, निरुपण यांच्या विरोधात अनुशासनहीनता आणि पक्षविरोधी विधानांच्या तक्रारींनंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी संजय निरुपम यांची हकालपट्टी करण्यास मान्यता दिल्याचे म्हटले आहे. त्यानंतर निरुपम यांनी स्वत: पक्षाच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा देत, त्यांची भूमिका मांडली आहे. (Sanjay Nirupam)

Sanjay Nirupam: काँग्रेस पक्षाची तत्‍परता पाहून छान वाटलं

संजय निरुपम यांनी पक्षाच्या या कारवाईबाबत मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी X वर लिहिले की, ‘काल रात्री माझा राजीनामा पत्र मिळाल्यानंतर पक्षाने माझी हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसते. इतकी तत्परता पाहून छान वाटलं, असा टोला देखील निरुपम यांनी पक्षश्रेष्टींना लगावला आहे.

निरुपम यांच्या नाराजीचे कारण काय?

संजय निरुपम यांनी शिवसेना ठाकरे गटाच्‍या यादीवर तीव्र आक्षेप नोंदवत ‘मुंबईत त्यांना पाच जागा लढवायच्या आहेत आणि त्या काँग्रेससाठी देणगी म्हणून सोडणार आहेत. मुंबईतील काँग्रेसला संपवण्यासाठी हा निर्णय आहे. या निर्णयाचा मी निषेध करतो. निरुपम पुढे म्हणाले की, ठाकरे यांनी एकतर्फी उमेदवार जाहीर करून युती धर्म पाळला नाही. उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी देण्यासही काँग्रेस नेत्याने विरोध केला. परंतु अमोल खिचडी हे कंत्राट घोटाळ्यातील आरोपी असून त्याची ईडीकडून चौकशी सुरू आहे, असे देखील निरुपम यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा:

Back to top button