Jalgaon Crime Update : शिवजयंती मिरवणुकीवर दगडफेक प्रकरणी ३२ जणांना अटक | पुढारी

Jalgaon Crime Update : शिवजयंती मिरवणुकीवर दगडफेक प्रकरणी ३२ जणांना अटक

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
छत्रपती शिवाजी महाराज याची तिथीप्रमाणे जयंती तालुक्यातील शिरसोली येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत होती. यावेळी काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर काही समाजकंटकांनी दगडफेक केल्याने यामध्ये पाच ते सहा जण जखमी झाले. या प्रकरणात एमआयडीसी पोलिसांनी 36 जणांना ताब्यात घेतलेले असून चार जण अल्पवयीन असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर 32 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथी प्रमाणे संपूर्ण जिल्ह्यात साजरी करण्यात येत होती. तालुक्यातील शिरसोली  गुरुवारी (दि.२८) रोजी गावात तिथीप्रमाणे रात्री ८ वाजता इंदिरा नगर येथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक वराड गल्लीतील मशिदी जवळून जात असताना काही समाजकंटकांनी मिरवणूकीच्या दिशेने अचानक दगडफेक करण्यास सुरूवात केली. यावेळी मिरवणूकीत सहभागी झालेले नागरीक आणि बंदोबस्त ठेवणारे होमगार्ड देखील जखमी झाले. या घटनेमुळे शिरसोली गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मिरवणूकीत दगडफेक झाल्याची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, दिपक जगदाळे, सहायक पोलीस निरीक्षक आसाराम मनोरे यांच्यासह एमआयडीसी पोलीस ठाण्यात पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर समाजकंटकांची पांगापाग होण्यास सुरूवात झाली. यामध्ये पोलीसांनी एकूण ३६ जणांना ताब्यात घेतले आहे. तर ४ अल्पवयीन मुलांचा यामध्ये समावेश आहे.

यांच्यावर झाला गुन्हा दाखल !
मेहमुद समसोद्यीन पिंजारी (वय-२४), जैनुद्दीन शेख निजामोद्यीन (वय-२४) साहिल शेख भिकन (वय-१९), शेरु शेख बिस्मील्ला (वय-३२), रिसलोद्यीन ऊर्फ अदनान जैनुद्दीन शेख (वय-२२), इब्राहीम शह मलंग शहा (वय-३५), तनवीर शेख सलीम (वय-१९), जुबेर शेख नबी (वय-३०), शहारुख शेख अल्लाउद्दीन (वय-२२), वसिमखान रहिम खान (वय-४०), आसिफ शेख इब्राहिम शेख (वय-२९), तन्वीर खान रहिम खान (वय-३४), फरदिन ऊर्फ इम्रानसर शकिल शेख (वय-२०), अल्ताफ शेख बशिर (वय-१९), शेख तन्वीर शेख युनूस (वय-२२), शईद लतिफ पिंजारी (वय-३२), आझाद ऊर्फ आवेश मोहसीन पिंजारी (वय-१९), फरीद शहा फयाज शहा (वय-२९), कुरबान शेख गफुर (वय-१९), अशपाक इलीयाज पिंजारी (वय-२८), अबुजर हमीद खाटीक (वय-२४), सैय्यद उर्फ बबलु नुरअली, तौफिक रफिक मनीयार (वय-२३), दानिष सबदर खान (वय-२७), रेहान सादीक मनियार (वय-१९), फिरोज गफार सैयद (वय-२३), वाहिदखान अयुबखान ऊर्फ बाबु (वय-२०), अशपाक सलीम पिंजारी (वय-१९), दानिश जाकीर पिंजारी (वय-२२), समीर नइमोद्दिन पिंजारी (वय-२६), अहमद मुबारक पिंजारी (वय-१९), अजिम शेख नाजीम (वय-१२) यांच्यासह इतर ४ अल्पवयीन मुले (सर्व रा. शिरसोली ता. जि. जळगाव) या एकुण ३६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून उर्वरित ३२ जणांना एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे.

जखमी झालेल्यांची नावे अशी..
मिरवणूकीत झालेल्या दगडफेकीत विशाल ज्ञानेश्वर बारी (वय-२२), निलेश भगवान पाटील (वय-१९), विशाल दिलीप पाटील (वय-२५), मंगेश साहेबराव पाटील (वय-३०), बाळू तुळशीराम पाटील (वय ४५) यांच्यासह होमगार्ड पंकज लक्ष्मण सापकर असे सहा जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर शिरसोली परिसरात तणावपूर्ण शांतता असून कायदा व सुवव्यस्थेसाठी पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.

Back to top button