Lok Sabha Election: मी अकोल्यातून उमेदवारी अर्ज भरणार; प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केली भूमिका | पुढारी

Lok Sabha Election: मी अकोल्यातून उमेदवारी अर्ज भरणार; प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केली भूमिका

पुढारी ऑनलाईन डेस्क: केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर देशभरात लोकसभेच्या रणधुमाळीला सुरवात झाली आहे. दरम्यान वंचित बहुजन आघाडी मविआमध्ये आहे की नाही? या बद्दल संभ्रम असतानाच अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आपण अकोल्यातून बुधवारी (२७ मार्च) लोकसभेसाठी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगितले. आज (दि.२४) माध्यमांशी बोलताना हे स्पष्ट केले. (Lok Sabha Election)

२६ मार्चला पक्षाची दिशा स्पष्ट करणार; अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, २६ मार्चला वंचित बहुजन आघाडीची पुढील दिशा स्पष्ट केली जाणार आहे. मविआमध्ये १५ जागांवर तिढा कायम आहे. तो त्यांनी प्रथम सोडवावा. काँग्रेसने ७ जागा कळवल्यास आम्ही त्यांना पाठींबा देऊ. मी वंचित बहुजन आघाडीकडून २७ मार्च रोजी अकोल्यातून उमेदवारी अर्ज भरणार आहे, असे त्यांनी सांगितले. (Lok Sabha Election)

संविधान बदण्यासाठीच भाजपकडून ४०० पारचा नारा; आंबेडकरांचा आरोप

संविधान बदलण्यासाठीच भाजपकडून ४०० पारचा नारा दिला जात आहे. परंतु मला आजही १९४९ ची RSS ची शपथ आज देखील आठवते, त्यावेळी त्यांनी संविधान बदलण्याची घोषणा केली होती. महायुतीकडे उमेदवार नाहीत, त्यामुळे भाजपकडून फोडाफोडीचे राजकारण सुरू असल्याचे आंबेडकर म्हणाले. जेव्हा महायुती ४०० पार म्हणतात, तेव्हा ते राज्यशासन करण्यासाठी नाही , तर राज्यघटना बदलण्यासाठीच असा आरोपही वंचित बहुजण आघाडीचे प्रकाश आंबेडकर त्यांनी केला आहे. (Lok Sabha Election)

हे ही वाचा:

 

Back to top button