जळगाव जिल्ह्यात आदर्श आचार संहिता लागू  | पुढारी

जळगाव जिल्ह्यात आदर्श आचार संहिता लागू 

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी शनिवार (दि.16) रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची घोषणा केलेली असून या तारखेपासून निवडणूकीची आचार संहिता संपूर्ण जळगाव जिल्हयात सुरु झालेली आहे. त्यामुळे  आदर्श आचार संहितेचे काटेकोर पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

‘दि महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डिफेसमेंट ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट 1995’ व भारत निवडणूक आयोग, दिल्ली यांनी वेळोवेळी निर्गमीत केलेले आदेश व निर्देश यानुसार विना परवाना खाजगी अथवा सार्वजनिक मालमत्तेवर पोस्टर्स लावणे, घोषणा लिहिणे, निवडणूक चिन्ह लिहिणे, कापडी फलक लावणे, झेंडे लावणे व इतर कारणाने मालमत्ता विद्रुपित करणेवर बंदी घातलेली आहे. अशा प्रकारे ज्या राजकीय पक्ष उमेदवाराने खाजगी अथवा सार्वजनिक मालमत्ता विद्रुपित केली असेल त्यांनी अशी पोस्टर्स, भित्ती पत्रके, घोषणा, झेंडे, कापडी फलक, व चिन्ह इ. काढून टाकण्याची तातडीने व्यवस्था करावी.

दि महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डिफेसमेन्ट ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट 1995 अन्वये अशा प्रकारे मालमत्ता विद्रुपित केल्यास तीन महिन्यापर्यंत तुरुंगवास अथवा दोन हजार रुपयांपर्यंत दंड अथवा दोन्हीही शिक्षेस संबंधित इसम पात्र राहील. जळगाव लोकसभेचे मतदान ही चौथ्या टप्प्यात होणार आहे. यामध्ये जळगाव व रावेर लोकसभा अशा दोन लोकसभांचे मतदान १३ मे रोजी होणार आहे.

जळगाव जिल्ह्यातील जळगांव लोकसभेमध्ये मतदान केंद्र 1970 सहाय्यक मतदान केंद्र 12 असे 1982 मतदान केंद्र असणार आहे.
रावेर लोकसभेमध्ये मतदान केंद्र 1898 सय्यद मतदान केंद्र सह असे एकूण 1904 मतदान केंद्र आहे.
तर जळगाव जिल्ह्यामध्ये पुरुष 1819838 महिला 1689556 तर तृतीयपंथीय 131 असे एकूण 3509525 असे मतदार आहेत.

Back to top button