काळजी घ्या! राज्यात पाऱ्याची चाळिशी; हंगामातील सर्वोच्च तापमानाची नोंद

काळजी घ्या! राज्यात पाऱ्याची चाळिशी; हंगामातील सर्वोच्च तापमानाची नोंद

पुणे : पुढारी वृत्तसेवा : यंदाच्या हंगामात 12 मार्च रोजी तापमानाने चाळिशी गाठली असून, ही नोंद सर्वप्रथम मालेगावमध्ये मंगळवारी (दि. 12) झाली. त्यापाठोपाठ विदर्भ, मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागांचा पारा 39 अंशांपुढे पोहोचला आहे. यंदा विदर्भाच्या आधी मध्य महाराष्ट्रात कमाल तापमानात वेगाने वाढ झाली. त्यापाठोपाठ उत्तर महाराष्ट्र तापला. सोमवारी मालेगावचे तापमान 39.2 अंशांवर होते. मंगळवारी ते थेट 40 अंशांवर गेले. त्यापाठोपाठ विदर्भ अन् मध्य महाराष्ट्रातील बहुतांश शहरांचे तापमान 38 ते 39 अंशांवर गेले. यात प्रामख्याने सांगली, पुणे, अकोला, चंद्रपूर, वाशिम या शहरांचा समावेश आहे.

मंगळवारचे कमाल-किमान तापमान

मालेगाव 40 (19.4), पुणे 37.3 (16.5), जळगाव 37 (18.9), नाशिक 35.3 (18.4), सांगली 38.6 (21.3), सोलापूर 39.8 (23.8), मुंबई 31.6 (22.5), छत्रपती संभाजीनगर 35.6 (20.4), परभणी 38.4 (21.4), अकोला 38.6 (20.2), अमरावती 37.2 (20.7), बुलडाणा 35.4 (21.8), चंद्रपूर 39.4 (20.4), नागपूर 38.5 (19.8).

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news