Rajya Sabha Elections : राज्यसभेसाठी कॉंग्रेसकडून चंद्रकांत हंडोरेंना उमेदवारी | पुढारी

Rajya Sabha Elections : राज्यसभेसाठी कॉंग्रेसकडून चंद्रकांत हंडोरेंना उमेदवारी

पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेसने राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने महाराष्ट्रातून चंद्रकांत हंडोरे यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. (Rajya Sabha Elections)

राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून चार उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. राजस्थानमधून सोनिया गांधी, बिहारमधून अखिलेश प्रसाद सिंह, हिमाचल प्रदेश मधून श्री अभिषेक मनु सिंघवी तर महाराष्ट्रातून चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

कोण आहेत चंद्रकांत हंडोरे?

“भीम शक्ती” या आंबेडकरवादी आणि सामाजिक-राजकीय संघटनेचे संस्थापक आणि अध्यक्ष चंद्रकांत दामोदर हंडोरे यांना कॉंग्रेसने महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी उमेदवारी घोषित केली आहे. हंडोरे हे महाराष्ट्र काँग्रेसचे सदस्य आहेत. ते विलासराव देशमुख मंत्रीमंडळात होते. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेक पदांची जबाबदारी स्विकारली आहे. १९९२ ते १९९३ या कालावधीत त्यांची मुंबईच्या महापौरपदी निवड झाली. २०१४ ते २०२१ या कालावधीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष होते. तर ५ फेब्रुवारी २०२१ रोजी हंडोरे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. 2020 पासून ते मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रभारीही आहेत. चंद्रकांत हंडोरे २०२२ मध्ये राज्यात झालेल्या विधान परिषदेची निवडणुकमध्ये पराभूत झाले होते.

 

हेही वाचा 

Back to top button