राज्यात तीन दिवस उकाडा जाणवणार; विदर्भ, मराठवाड्यात पाऊस शक्य | पुढारी

राज्यात तीन दिवस उकाडा जाणवणार; विदर्भ, मराठवाड्यात पाऊस शक्य

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सोमवारपासून राज्यातील किमान व कमाल तापमानात अचानक 4 ते 5 अंशांनी वाढ झाल्याने उकाडा जाणवत आहे. असे वातावरण 8 फेब्रु वारीपर्यंत राहिल. 9 ते 11 फेब्रुवारी दरम्यान मात्र विदर्भ अन् मराठवाड्यातील काही भागात पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे त्या कालावधित राज्यात थंडी किंचित वाढेल. त्यानंतर मात्र पुन्हा उकाड्याला सुरुवात होईल. सोमवारी 5 फेब्रुवारीपासून राज्यातील किमान व कमाल तापमानात वाढ झाली असून उन्हाळ्याची चाहुल देणारा उकाडा सुरु झाला आहे.

असे वातावरण 8 फेब्रुवारीपर्यंत राहील. मात्र विदर्भ अन मराठवाड्यात 9 ते 11 फेब्रुवारीदरम्यान तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होईल असा अंदाज आहे. त्यामुळे या तीन दिवसांत थंडीत किंचित वाढ होईल. या कालावधित कोकण, मध्य महाराष्ट्रात मात्र पावसाचा अंदाज नाही. उत्तर भारतात जेट स्ट्रीम विंडस (झोतवारा) चा प्रभाव अजूनही असून समुद्र सपाटीपासून 12.5 कि.मी उंचीवरील हवेच्या थरांत या वार्‍याचा प्रभाव असल्याने उत्तर भारतात अजूनही कडाक्याची थंडी आहे. महाराष्ट्रात मात्र कमाल व किमान तापमानात मोठी वाढ झाली आहे.

मंगळवारचे कमाल व किमान तापमान (अंश सेल्सिअस)

अहमदनगर 33.2 (13.7), पुणे 34.8 (16.2), जळगाव 33 (15), कोल्हापूर 33.6 (20.7), महाबळेश्वर 28.3 (16.8), नाशिक 32.5 (16.2), सांगली 34.4 (20.1), सातारा 34.1(18.5), सोलापूर 36.3 (20.8), मुंबई 30.5 (21.8), धाराशिव 32 (19.4), संभाजीनगर 33.4 (17.7), परभणी 34.6 (18.2), अकोला 35.4 (17.6), अमरावती 33 (16.9), चंद्रपूर 33.4 (14.8), नागपूर 33.8 (15.8).

हेही वाचा

Back to top button