Weather Update : राज्यात पुन्हा थंडीची लाट | पुढारी

Weather Update : राज्यात पुन्हा थंडीची लाट

पुणे : उत्तर भारतातील बहुतांश राज्यांत थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. काश्मीरसह ईशान्यकडील राज्यांत पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. यामुळे राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. बुधवारी राज्यात सर्वांत कमी 10.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद जळगावमध्ये झाली, तर पुणे 13. 4 अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली.

दरम्यान, पुढील आठवडाभर राज्यात थंडीचा कडाका राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. उत्तर भारतात थंडीचा कडाका तसेच काश्मीर आणि ईशान्य भारतातील सर्वच राज्यांत हिमवर्षाव होत आहे. यामुळे या भागात कडाक्याची थंडी तसेच पाऊस व दाट धुके पसरले आहे.

हेही वाचा

Back to top button