Kolhapur-Sangli Ramling Temples : कोल्हापुरातील ‘या’ रामलिंग मंदिरांना भेट दिलीय का?

Kolhapur-Sangli Ramling Temple
Kolhapur-Sangli Ramling Temple
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क – कोल्हापूर जिल्ह्यात रामलिंग नावाची अनेक ठिकाणे आहेत. आज आपण काही प्रसिद्ध रामलिंग मंदिरांची माहिती पाहणार आहोत. (Kolhapur-Sangli Ramling Temples) खूप कमी खर्चात तुम्ही या ठिकाणांना भेट देऊ शकता. शिवाय एक रामलिंग आणि परिसर पाहण्यासाठी एका दिवसाचा कालावधी पुरेसा ठरतो. सर्व ठिकाणे डोंगराच्या कुशीत, धबधबे, खळखळणारे झरे आणि हिरव्यागार निसर्गात पाहता येतात. हातकणंगले तालुक्यात आळते गावाजवळ रामलिंग म्हणून असेच एक स्थान आहे. रामलिंग नावाची अनेक ठिकाणे आहेत. (Kolhapur-Sangli Ramling Temples)

संबंधित बातम्या –

गगनबावड्यातील रामलिंग – 

कोल्हापूर जिल्ह्यातील निसर्गरम्य आणि हिरवाईने नटलेला परिसर म्हणजे पळसंबे. पळसंबे (ता. गगनबावडा) येथील रामलिंग मंदिर आणि गुहेतील शिवलिंग अशी दोन क्षेत्र.

याठिकाणी देशभरातील पर्यटक भेटी द्यायला येतात. निसर्गाचा अद्भूत चमत्कार म्हणावा, असे हे ठिकाण. इथे गेल्याशिवाय या चमत्काराची प्रचिती येणार नाही. त्यामुळे तुम्ही इथे कुटुंबासह किंवा सोलो ट्रीपदेखील करू शकता.

गगनबावडा तालुक्यात पळसंबे गावामध्ये रामलिंग गुहा आणि मंदिर आहेत. येथील आकर्षण म्हणजे पावसाळ्यात धो-धो वाहणारा धबधबा, दाट धुके आणि उन्हाळ्यातदेखील गारवा देणारे ठिकाण. हे ठिकाण पांडवकालीन लेण्यांसाठीही प्रसिद्ध आहेत. अखंड शिळेमध्ये कारलेले रामलिंग हे आणखी एक वैशिष्ट्य सांगता येईल.

रामलिंगचा धबधबा आणि रामलिंग गुहेत पडणारे पाणी एक वेगळी अनुभूती देऊन जाते. या गुहेत पाणी कमी असताना जाता येते. गुहेच्या दगडांमधून पाझरणारे पाणी अंगावर झेलत शिवलिंगाचे दर्शन गुहेत करता येते. गुहेत काळोख असल्यामुळे येथे जाताना मोबाईलची टॉर्च अथवा मोठी टॉर्च घेऊन जावे. खळखळणाऱ्या नितळ पाण्यातून मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेणे, अविस्मरणीय आहे.

पळसंबे रामलिंग स्थळी कसे जाता येईल?

कोल्हापूर शहरापासून ४२ किलोमीटर अंतरावर पळसंबे गाव आहे. कोल्हापूर-बालिंगा-कळे मार्गे पळसंबे. पळसंबे गावापासून डावीकडे ३ किलोमीटर अंतरावर हे ठिकाण असून या ठिकाणी चारचाकी-दुचाकी जाते. आडबाजूला हे रामलिंग असल्यामुळे नीरव शांतता, हिरवागार निसर्ग आणि धार्मिक पर्यटन अशी ओळख ठरली आहे. येथे बौद्धकालीन लेणी असल्याचेही म्हटले जाते. (Kolhapur-Sangli Ramling Temples)

गगनगिरी महाराजांचे मठ –

हे ठिकाण पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जात असले तरी त्यास व्यावसायिक रूप देण्यात आलेले नाही. याठिकाणी अनेक पर्यटकांसोबत शाळेच्या सहलीदेखील भेट देण्यास येतात.

या रामलिंग ठिकाणाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथे गगनगिरी महाराजांचे बाजूलाच मठ हेय या मठाचा विस्तीर्ण परिसर असून अतिशय सुंदर आणि स्वच्छ आहे. तुम्ही याठिकाणी बसून जेवणाचा आस्वाददेखील घेऊ शकता.

काय खाता येईल?

पळसंबे गावात खाण्याची कोणतीही सोय नाही. इथे जाताना देखील पिण्यासाठी पाणी घेऊन जावे. पण, पळसंबेपासून पुढे गेल्यानंतर गगनबावड्याचे मुख्य ठिकाण एसटी स्टॅण्डजवळ शाकाहारी जेवण मिळू शकते. शिवाय, नाष्टा, चहा-पाण्याची अनेक दुकाने इथे आहेत.

पळसंबे रामलिंगकडे जाणारा मार्ग
पळसंबे रामलिंगकडे जाणारा मार्ग

आळते रामलिंग –

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात आळते गावाजवळ रामलिंग आहे. रामलिंग नावाची अनेक ठिकाणे आहेत. आळते गावात डोंगराच्या कुशीत दडलेलं रामलिंग. याठिकाणी गेला तर तुम्हाला मंदिराच्या बाहेर गोमुखातून सतत पाण्याची धार पडताना दिसेल. येथील पाणी कधीच आटत नाही. १२ महिने २४ तास ही धार सुरु असते. रामलिंगच्या गुहेतून गेल्यानंतर शिवपिंड आहे, या शिवपिंडीवर गुहेतील काळ्या दगडातून झिरपणारे पाणी पडत असते. संपूर्ण गुहेत दगडांमधून पाझरणारे पाणी, गारवा आणि मनाला समाधान देते. हे पाणी अत्यंत पवित्र आणि स्वच्छ आहे. मंदिर परिसरात अनेक छोटी मंदिरे आणि पाण्याचे कुंड आहेत. विठोबा रखुमाईची मूर्ती, धुनी अग्निकुंड, पार्वती, गणपती, वीरभद्र, कालभैरव यांच्या मूर्ती आहेत. सप्तर्षीच्या नावाची मंदिरे आणि दगडी धर्मशाळा देखील आहे. कोल्हापूरपासून गेल्यास एका दिवसात ही ठिकाणे पाहून होतात. या मंदिर परिसरात धुळोबा जागृत देवस्थान मंदिरही आहे.

याशिवाय काय पाहता येईल?

बाहुबली (कुंभोज) हे जैन धर्मीयांचे कोल्हापूर जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र आहे. जहाज मंदिर आणि संग्रहालय, पद्मावती मंदिर, आलमप्रभू डोंगर, आळते.

काय खाल?

याठिकाणी शुद्ध सात्विक जेवणाचे हॉटेल आहेत. पाणी, मुलांसाठी खाऊची छोटी दुकानेदेखील आहेत.

बहेतील रामलिंग –

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात कृष्णा नदीमध्ये रामलिंग नावाचे बेट आहे. या बेटावर शिवपिंड आणि रामाचेही स्थान आहे. हे क्षेत्र 'बहेचा मारुती' म्हणूनही ओ‍ळखले जाते. मारुतीचे क्षेत्र म्हणजे बहे बोरगाव हे खूप निसर्गरम्य ठिकाण आहे. बहे रामलिंग बेटावर कसे जाता येईल पाहा.

बहे रामलिंग स्थळी कसे जाता येईल?

कोल्हापूरहून जायचे असल्यास एनएच ४ हायवेवरून तुम्हाला सर्वात आधी इस्लामपूरमध्ये जावे लागेल. येथून सहा किलोमीटरवर बहे गाव आहे. या गावच्या अलिकडेच डाव्या बाजूने बंधारा असून तेथून थोड्या अंतरावर चालत जावे लागते, जिथे कृष्णेच्या नदीमध्य़े रामलिंग बेट आहे. ((Kolhapur-Sangli Ramling Temples))

काय खाल?

इस्लामपूर शहर मोठे असल्यामुळे याठिकाणी जेवणाची सर्व सोय उपलब्ध आहेत. अनेक हॉटेल्स, रेस्टॉरंट्स उपलब्ध आहेत.
शिवाय तुम्हाला इस्लामपूरमधील राजाराम नगर येथे प्रभू श्रीरामांचे मोठे मंदिर आहे. येथे रामनवमीला मोठी यात्रा भरते.

विशेष म्हणजे वरील तिन्ही रामलिंग मंदिरापर्यंत दुचाकी-चारचाकी गाड्या जातात.

photo : jeevan_mali__saurabh_pawar07 insta वरून साभार 

हे खालील सर्व फोटो पळसंबे रामलिंग येथील आहेत- 

धुक्यातील गगनबावडा
धुक्यातील गगनबावडा
गुहेच्या बाहेरील छोटेखानी मंदिर
गुहेच्या बाहेरील छोटेखानी मंदिर
नितळ, स्वच्छ पाणी
नितळ, स्वच्छ पाणी
अखंड शिळेतील मंदिर
अखंड शिळेतील मंदिर

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news