Maharashtra Politics : ठाकरे गटाच्या खासदारांच्या निलंबनाची शिंदे गटाची मागणी | पुढारी

Maharashtra Politics : ठाकरे गटाच्या खासदारांच्या निलंबनाची शिंदे गटाची मागणी

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  पक्षांतर आणि ‘व्हिप’च्या उल्लंघनावरून शिवसेनेच्या दोन्ही गटांत सुरू असलेले निलंबनाचे डावपेच आता लोकसभेतही सुरू होण्याची चिन्हे आहेत. नारी शक्ती वंदन विधेयकावरील मतदानाचा ‘व्हिप’ न पाळल्याबद्दल विनायक राऊत, राजन विचारे, ओमराजे निंबाळकर आणि संजय जाधव या चार खासदारांच्या निलंबनाची प्रक्रिया सुरू करण्याच्या हालचाली शिंदे गटाने सुरू केल्या आहेत. यासंदर्भात कायदेशीर सल्ला घेऊन लोकसभा अध्यक्षांकडे निवेदन सादर केले जाणार आहे.

संसदेच्या विशेष अधिवेशनात मांडण्यात आलेल्या नारी शक्ती वंदन विधेयकावरील मतदानास अनुपस्थित राहिलेल्या खासदारांवर ‘व्हिप’चे उल्लंघन केल्याचा ठपका शिंदे गटाकडून ठेवण्यात येत आहे. यासंदर्भात शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे म्हणाले की, लोकसभेत शिवसेना पक्षाचे प्रतोदपद खासदार भावना गवळी यांच्याकडे आहे. त्यांनी जारी केलेला ‘व्हिप’ शिवसेनेच्या सर्व खासदारांना बंधनकारक आहे.

Back to top button