महत्त्वाची बातमी ! आगामी काळात राज्यात अशी असेल पावसाची स्थिती | पुढारी

महत्त्वाची बातमी ! आगामी काळात राज्यात अशी असेल पावसाची स्थिती

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  ऑगस्ट महिना संपला तरी पावसाने हजेरी लावली नाही. त्यामुळे राज्यातील कमाल तापमानात वाढ होऊ लगली आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात उन्हाचा चटका बसत आहे. दरम्यान, कमाल तापमानाचा पारा 30 ते 33 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. पुढील पाच ते सहा दिवस राज्यात केवळ पावसाच्या हलक्या सरी बरसतील, तर विदर्भात मेघगर्जना, विजांच्या कडकडाटात पाऊस बरण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

राज्यातून गेल्या सुमारे महिनाभरापासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे हळूहळू कमाल तापमानात वाढ होत गेली. त्यामुळेच उकाडा आणि उन्हाचा चटका वाढत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका, तर विदर्भात विजांचा कडकडाट, तसेच मेघगर्जनेसह पाऊस पडेल.

हेही वाचा :

पुणे : ‘त्या’ पिलरचा अहवाल तत्काळ सादर करा ; महापालिका आयुक्तांचे आदेश

पुणे : वाहनतळांसाठी मेट्रोनेच जागा शोधाव्यात ; महापालिका आयुक्तांच्या सूचना

Back to top button