कोकण वगळता 3 ऑगस्टपर्यंत राज्यात पावसाचा जोर कमी

कोकण वगळता 3 ऑगस्टपर्यंत राज्यात पावसाचा जोर कमी
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  आगामी पाच दिवस कोकणातच पावसाचा जोर कायम राहणार असून, उर्वरित राज्यात शनिवारपासून पाऊस ओसरण्यास सुरुवात झाली आहे. 3 ऑगस्टपर्यंत राज्यात अशी स्थिती राहणार आहे. आठ दिवस राज्यात सर्वत्र चांगला पाऊस झाला. त्यामुळे राज्याची सरासरी 17 टक्क्यांनी अधिक झाली आहे. 18 ते 20 जुलैपासून सुरू झालेला पाऊस 28 जुलैपर्यंत मुसळधार पडत होता. 29 रोजी कोकण वगळता राज्यातील बहुतांश भागातून पाऊस कमी होत आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने उत्तर भारतात पाऊस वाढतच आहे. मात्र, दक्षिण भारतात पाऊस कमी होत आहे. 3 ऑगस्टपर्यंत ही स्थिती राहणार आहे. दरम्यान, कोकणात 3 ऑगस्टपर्यंत यलो अलर्ट देण्यात आला असून, उर्वरित भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल.

24 तासांत राज्यात झालेला पाऊस

कोकण : अंबरनाथ 165, वाडा 115, जव्हार 112, म्हसळा 96, पोलादपूर, शहापूर 95, माथेरान 88, माणगाव 84, विक्रमगड 83, पनवेल 82, रोहा, तळा, मोखेडा 79, सुधागड पाली 76, उल्हासनगर, 74, भिवंडी 72, वसई, मुरबाड, महाड 70, श्रीवर्धन 65.

मराठवाडा : शिरूर कासार 25, वाशी 14, बीड 1.0.

विदर्भ ः एटापल्ली 48, मुलचेरा 45, भामरागड 36, गोंडवपरी 30, तुमसर, चामोशी 28, सालेकसा 24, गडचिरोली 22, सावली 20, देवरी 19, मूल 13, धानोरा, आमगाव 12, राजुरा 10.

घाटमाथा : कोयना (नवजा) 130, डुंगरवाडी 122, ताम्हिणी 120, अम्बोणे 120, दावडी 102, लोणावळा (ऑफिस), 90, लोणावळा (टाटा) 89, खंद 83, कोयना 77, खोपोली 75, वळवण 74.

मध्य महाराष्ट्र : महाबळेश्वर 129, लोणावळा 100, इगतपुरी 86, पेठ 51, ओझरखेडा 50, गगनबावडा, त्र्यंबकेश्वर 47, सुरगाणा 36, हर्सुल 26, पन्हाळा, चंदगड, पाटण, पौड, मुळशी 23, वडगाव मावळ 13, जुन्नर, आंबेगाव घोडेगाव 12.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news