US News | वीज अंगावर पडून गंभीर जखमी झालेली भारतीय मुलगी चमत्कारिकरित्या बचावली

US News | वीज अंगावर पडून गंभीर जखमी झालेली भारतीय मुलगी चमत्कारिकरित्या बचावली
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेमधील भारतीय वंशाची २५ वर्षीय विद्यार्थीनीवर वीज पडून  ती गंभीररित्या जखमी झाली होती. तिने मृत्यूशी झुंज दिली. आता ती लवकरच तिचे उर्वरित आयुष्य जगू शकते असं तिच्यावर  उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले आहे. तिच्या आई- वडिलांनी तिच्यावर वैद्कीय उपचारासाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले आहे (US News)

माहिती तंत्रज्ञान विषयात पदव्युत्तर शिक्षण 

सुसरोन्या कोडुरू ही भारतीय वंशाची मुलगी पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत आली. ह्यूस्टन विद्यापीठात माहिती तंत्रज्ञान विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत होती. तिने तिचा अभ्यासक्रम जवळजवळ पूर्ण केला होता आणि इंटर्नशिपच्या संधीची वाट पाहत होती. सुसरोन्या २ जुलै रोजी सॅन जॅसिंटो स्मारक उद्यानात तिच्या मित्रांसह तलावाजवळ फिरत असताना वीज पडली. गेल्या आठवड्यापासून ती मृत्यूशी झूंज देत आहे. तिला व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले आहे, असे रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले.

तिच्या प्रकृतीवर लक्ष ठेवणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की तिची तब्येत आता सुधारत आहे. तिच्या मेंदूचे कार्य पुन्हा पूर्वीसारखे होण्याची  वाट पाहत आहोत. तिला श्वास घेता येत नसल्यामुळे आणि पोषणाला आधार देण्यासाठी कोडुरूला व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले होते.

तिच्या पालकांना हैद्राबादहून ह्यूस्टनला आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोडुरूच्या कुटुंबातील सदस्यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, तिच्या पालकांचा अमेरिकेसाठी व्हिसा मंजूर झाला आहे आणि ते पुढील आठवड्यात येणार आहेत.

US News : विद्यापीठाने ट्विट करत म्हंटल…

ह्यूस्टन विद्यापीठाने २६ जुलै रोजी ट्विट केले होते की, "ह्यूस्टन विद्यापीठातील पदवीधर विद्यार्थिनी सुसरोन्या कोडुरू, जिला या महिन्याच्या सुरुवातीला विजेचा धक्का बसला होता, त्याबद्दल आम्हाला वाईट वाटत आहे". पुढे असे म्हटलं आहे की, ते भारतातील तिच्या कुटुंबाच्या जवळच्या संपर्कात आहेत. परिस्थितीच गांभीर्य ओळखून संस्थेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तिचे सहकारी विद्यार्थी आणि विद्वान सेवा कार्यालय यूएस व्हिसा प्रक्रियेत तिच्या पालकांना मदत करत आहे.

कुडुरूचे चुलत भाऊ सुरेंद्र कुमार कोठा यांनी सांगितले की, "जेव्हा तिला विजेचा धक्का बसला. त्यानंतर ती तलावात फेकली गेली. तेव्हा रक्ताभिसरण पूर्ववत होण्याआधी २० मिनिटानंतर तिला हृदयविकाराचा झटका आला." त्यानंतर, तिच्या मेंदूला धक्का बसला आणि ती कोमात गेली. तिचे कुटूंबीय "GoFundMe" द्वारे वैद्यकीय खर्चाची पूर्तता करण्यासाठी आवाहन करत आहेत. तिच्या कुटुंबाने सर्वांना मदतीची विनंती केली आहे जेणेकरून ती तिच पुर्वीसारखे सर्वसामान्य आयुष्य जगू शकेल.

गेल्या ३० वर्षांत वीज पडून वर्षाला सरासरी ४३ मृत्यू

राष्ट्रीय हवामान सेवेनुसार, दरवर्षी वीज पडण्याची शक्यता सुमारे १.२ दशलक्षांपैकी एक आहे. गेल्या ३० वर्षांत वीज पडून वर्षाला सरासरी ४३ मृत्यू झाले आहेत. विजेचा धक्का बसलेल्या लोकांपैकी दहा टक्के लोकांचा मृत्यू होतो, तर ९० टक्के लोकांना विविध प्रकारचे अपंगत्व येते, असे त्यात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news