‘आभा’ कार्डसाठी नोंदणी करावी ; राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे आवाहन | पुढारी

‘आभा’ कार्डसाठी नोंदणी करावी ; राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे आवाहन

पुणे : पुढारी वृत्तसेवा : आयुष्मान भारत डिजिटल मिशन (आभा)चा एक भाग म्हणून भारत सरकारने डिजिटल हेल्थ कार्ड (आभा आरोग्य खाते) हा उपक्रम सुरू केला आहे. सर्व नागरिकांसाठी आभा कार्डसाठी नोंदणी करावी, असे आवाहन राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाचे आवाहन

रुग्णांची सर्व माहिती एकाच ठिकाणी आणि डिजिटल स्वरूपात मिळावी म्हणून आभा कार्ड सुरू करण्यात आले आहे. कार्डवर वैद्यकीय इतिहास, चाचण्या, केलेले उपचार इत्यादी माहिती साठविली जाणार आहे. माहिती डिजिटल स्वरूपात असल्यामुळे नागरिकांना तसेच डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी यांना रुग्णांची पार्श्वभूमी म्हणजेच मागील आजार, निदान, उपचार इत्यादी माहिती समजण्यास जलद आणि सोयीस्कर मदत होणार आहे. त्यामुळे वेळेची बचत होणार आहे

आभा हेल्थ कार्डच्या मदतीने देशभरातील सर्व हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. डिजिटल हेल्थ मिशनअंतर्गत प्रत्येक व्यक्तीसाठी युनिक हेल्थ कार्ड बनविले जाणार आहे. या हेल्थ कार्डचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी नोंदणी करावी, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

ऑनलाइन उपचार, टेलिमेडिसीन, ई-फार्मसी, पर्सनल हेल्थ रेकॉर्ड इत्यादी सुविधा यामध्ये नागरिकांना मिळतील. तुमचा मेडिकल रिपोर्ट किंवा रेकॉर्ड सहजरित्या तुम्ही हॉस्पिटल, मेडिकल, इन्शुरन्स यांना शेअर करता येणार आहे.

हेही वाचा :

अहमदनगर : महापालिकेत मानधनावर नेमणार 17 अभियंते

सांगली : कडेगावात आज गगनचुंबी ताबुतांच्या भेटी

Back to top button