पुणे : राज्यातील सर्वच भागांत शुक्रवारी अतिवृष्टी होणार आहे. 29 ते 31 जुलैपर्यंत हलका ते मध्यम पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. तसेच महाराष्ट्र किनारपट्टीला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या आठ दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत सूर्यदर्शन झालेले नाही. सर्वत्र चांगला पाऊस सुरू आहे. मात्र, मोठ्या पावसाचा जोर 28 पर्यंतच राहणार आहे. 28 रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यात अतिवृष्टीचा अंदाज देण्यात आला आहे, तर 29 जुलैपासून सर्वत्र हलका ते मध्यम पाऊस राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा
पट्टा तयार झाल्याने महाराष्ट्र ते कर्नाटक किनारपट्टीवर जोरदार पाऊस सुरू आहे. तेलंगणातील मुलुमू जिल्ह्यातील लक्ष्मीपेटा या गावात 24 तासांत तब्बल 650 मि.मी. भूपालपल्ली येथे 620 मि.मी., तर रेंगोडा या गावात 470 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. यंदाच्या हंगामातील 24 तासांतील हा सर्वात मोठा पाऊस ठरला आहे.
तेलंगणा, ओडिशातही अतिवृष्टी
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या पट्ट्यामुळे तेलंगणा, ओडिशा, आंध्र प्रदेश, विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाट परिसर आणि मराठवाड्यालाही शुक्रवारी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
24 तासांत राज्यातील पाऊस
कोकण : पेण 303, कुलाबा 223, लांजा 216, तळा 205, रत्नागिरी 201, मुरूड 199, म्हसळा 183, अलिबाग 183, दापोली 170, श्रीवर्धन 166, मंडणगड 160, माणगाव 151, माथेरान 145, हर्णे 139, सुधागड पाली, चिपळूण 138, रोहा 134, वाकवली 132, राजापूर 130, पोलादपूर 123. पालघर 121.
मध्य महाराष्ट्र : महाबळेश्वर 180, हर्सुल 171, गगनबावडा 162, लोणावळा 122, शाहूवाडी 73, सुरगाणा 66, चंदगड 62, त्र्यंबकेश्वर 50, आजरा 49, इगतपुरी 47, ओझरखेडा 44, पन्हाळा 37, सांगली 36, सांगोला 36, गडहिंग्लज, पौड, मुळशी 32, हातकणंगले 25, पाटण, शिरोळ, कोल्हापूर 24.
मराठवाडा : किनवट 85, धर्माबाद 45, हिमायतनगर 44, बिलोली 40, हदगाव 36.
विदर्भ : नागपूर 164, हिंगणा 147, हिंगणघाट 144, कामठी 137, समुद्रपूर 123, कळंब 113, वरोरा 90, राळेगाव 87, जीवती 85, वणी 79, भद्रावती 77, सिरोंचा, लाखांदरू 77, उमरेड 76, देवळी 74, पांढरकवडा 72, वर्धा 67, चंद्रपूर 64, धानोरा 63, गडचिरोली 61, भंडारा 60.
घाटमाथा : कोयना (नवजा) 215, डुंगरवाडी 194, ताम्हिणी 180, अंबोणे 180, कोयना (पोफळी) 169, दावडी 156, खोपोली 115, लोणावळा (टाटा) 109, लोणावळा (ऑफिस), 104, धारावी 99, वळवण 77, खंद 64.
हेही वाचा :