पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वर पुन्हा दरड कोसळली | Pune-Mumbai expressway | पुढारी

पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वर पुन्हा दरड कोसळली | Pune-Mumbai expressway

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वरील कामशेत बोगद्याजवळ मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावर पुन्हा एकदा दरड कोसळण्याची घटना घडली आहे. गुरुवारी रात्री आठ ते सव्वा आठच्या सुमारास येथे दरड कोसळली आहे. त्यामुळे मुंबईकडे जाणारे रस्त्यावरील एक लाईन बंद झाली होती.

पुणे मुंबई एक्सप्रेस वे वर आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळण्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी पुन्हा एकदा पुणे मुंबई एक्सप्रेस वे वर दररोज कोसळण्याची घटना घडली. या घटनेत कोणतीही जीवित हानी आणि वाहनांचे नुकसान झाले नाही. मात्र, मुंबईकडे जाणारी एक लाईन ठप्प झाली होती. रात्री दोन ते तीन तास आयआरबीच्या मदतीने येथील दरडीचा मलबा हटवण्याचे काम सुरू होते. येथील मलबा हटवल्यानंतर वाहनांसाठी वाहतूक सुरळीत करण्यात आली. अशी माहिती महामार्ग पोलिसांनी दिली.

Back to top button