राज्यात ‘कोसळधार’ सुरूच ! ही ठिकाणे अजूनही रेड अलर्टमध्ये | पुढारी

राज्यात 'कोसळधार' सुरूच ! ही ठिकाणे अजूनही रेड अलर्टमध्ये

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा कहर काही भाग वगळता गुरुवारी (दि. 20) सलग दुसर्‍या दिवशी सुरूच होता. या मुसळधार पावसामुळे राज्यातील बहुतांश भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, हवामान विभागाने यापूर्वी 25 जुलैपर्यंत जोरदार पावसाची शक्यता वर्तविली होती. आता नवीन अंदाजानुसार, 25 जुलैनंतरही पावसाचा जोर वाढणार आहे.

राज्यात गुरुवारीही कोकण, मुंबई आणि परिसरासह मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा, कोल्हापूर, सातारा तसेच विदर्भातील बहुतांश भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली. तर मराठवाड्यातील अनेक भागात मध्यम ते मुसळधार पाऊस सुरू होता. असे असले तरी पुणे शहर आणि परिसरात गुरुवारी दिवसभर पावसाने उघडीप दिली, तर घाटमाथ्यावरील पावसाचा जोर थोडा कमी झाला होता.

असे आहेत अलर्ट…

रेड : पालघर, ठाणे, मुंबईसह रायगड

ऑरेंज : रत्नागिरी, पुणे (घाटमाथा), कोल्हापूर

यलो : सिंधुदुर्ग, नाशिक, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, भंडारा, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ

गेल्या 24 तासांतील पाऊस (मिमीमध्ये)
माथेरान 398, उल्हासनगर 313, पोलादपूर 312, डहाणू 299, पालघर 273, चिपळूण 216, कल्याण 149, महाबळेश्वर 315, लोणावळा 278, गगनबावडा 118, राधानगरी 78, कोल्हापूर 33, सातारा 24, गडचिरोली 38, नागपूर 32.
घाटमाथा : ताम्हिणी 350, दावडी 320, कोयना (नवजा) 307, डुंगरवाडी 299, खोपोली 298, लोणावळा 253, शिरगाव 230.

हेही वाचा :

Irshalwadi Landslide Incident : मुसळधार पाऊस, अरुंद पायवाट, रात्रीचा अंधार; गिरीश महाजनांनी सांगिलता इरसाळवाडी गावातील थरार

Manipur Women Assault Video : मणिपूर महिला अत्याचार व्हिडिओप्रकरणी दोघांना अटक

Back to top button