बंडखोरांनी परत यावे, मी राज्यातून निघून जाईन : जितेंद्र आव्हाड | पुढारी

बंडखोरांनी परत यावे, मी राज्यातून निघून जाईन : जितेंद्र आव्हाड

ठाणे, पुढारी वृत्तसेवा : ७५ वर्ष काम केल्यानंतर माझे बाबा घरी बसले आणि ते परत कधी उठले नाही. त्यामुळे काम न करता घरी बसल्यावर काय होते हे मी अनुभवले आहे. त्यामुळे जादूगार असलेल्या पवार साहेबांना घरी बसा बोलणे हे मनाला वेदना देणारे आहे. मी आणि जयंत पाटील यांच्यामुळे तुम्ही साहेबांना सोडून गेला आहात ना? तुम्ही परत या, मी महाराष्ट्रातून बाहेर निघून जाईल पुन्हा दिसणार नाही, असे आवाहन राष्ट्रवादीचे सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटाला केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस फोडून उपमुख्यमंत्री अजित पवार आमदारांसह भाजपसोबत गेले आहेत. या भूकंपात जेष्ठ नेते छगन भुजबळ असून त्यांनी थेट शरद पवार यांच्यासह जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीकास्त्र सोडले. पाटील आव्हाड या बडव्यांनी पवारांना घेतल्याचा आरोप केला. त्यांनतर शरद पवार यांनी पहिली सभा नाशिक येथील येवला येथे सभा घेत आहेत. भुजबळ यांना आव्हान देण्यासाठी पवारांनी खंबर कसली असून ते मुंबईहून निघाले आहेत.

पवार यांचे सकाळी ठाण्यातील आनंद नगर येथे डॉ जितेंद्र आव्हाड आणि शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. त्यावेळी बोलताना आव्हाड यांनी शरद पवार हे जादूगार आणि जिद्दी असून ते भिवंडी, शहापूर, येवळा, धुळे आणि जळगाव असा प्रवास करणार आहेत. वेधशाळेने अतिवृष्टीचा इशारा दिल्याने तुम्ही प्रवास करू नका, असे सांगूनही पवार दौऱ्यावर निघाले आहेत, असेही आव्हाड यांनी सांगितले.

या वयात त्यांना त्रास देऊ नका, मी आणि जयंत पाटील बाजूला होतो, तुम्हाला राजकारणात दिसणार नाही, तुम्ही परत या, असे आवाहन आव्हाड यांनी बंडखोर आमदारांना केले आहे. यावेळी ठाणे शहर अध्यक्ष सुहास देसाई आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा :

 

 

 

Back to top button