Dr. Amol Kolhe : काल शपथविधीला उपस्थित, आज शरद पवारांबद्दल खा. कोल्हेंचे सुचक ट्विट | पुढारी

Dr. Amol Kolhe : काल शपथविधीला उपस्थित, आज शरद पवारांबद्दल खा. कोल्हेंचे सुचक ट्विट

पुढारी ऑनलाईन डेस्क :  राष्ट्रवादीचे नेते अजित पवार राष्ट्रवादीच्या समर्थक आमदारांसह शिंदे सरकारमध्ये सामील झाले. त्‍यांनी रविवारी (दि. २) उपमुख्यमंत्रीपदाची शपथ (Ajit pawar latest ) घेतली. या घडमोडीमुळे राज्याच्या राजकारणासह महाविकास आघाडीत भूकंप झाला आहे. राजकीय वर्तुळासह सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे. शरद पवार यांच्या कार्यकर्त्यांनी “आम्ही साहेबांसोबतच” अशा आशयाचे  फोटो, पोस्ट, ट्विट व्हायरल होवू लागले. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनीही एक भावनिक व्हिडिओ शेअर करत, “मी साहेबांसोबतच” म्हटलं आहे. (Dr. Amol Kolhe)

महाराष्ट्राच्या राजकारणातील घडामाेडी कमालीच्‍या वेगावल्‍या आहेत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांसह  शिंदे सरकारमध्ये सामील झाले आहे. त्‍यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली. महाविकास आघाडीला सुरुंग लागला. अजित पवारांच्या भुमिकेनंतर राष्ट्रवादीच्या काही नेते आणि कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्यासोबतचे फोटो, पोस्ट, ट्विट करत आम्ही साहोबांसोबतच अशा आशयाचे सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Dr. Amol Kolhe : पण बाप नाही विसरायचा…

राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनीही एक भावनिक व्हिडिओ शेअर करत, “मी साहेबांसोबतच” म्हटल आहे. त्यांनी ३० सेकंदाच्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे की, “साहेब सांगितलं ते धोरण, साहेब सांगतिल ते तोरण”  व्हिडिओमध्ये त्यांनी छत्रपती संभाजी महाराज या नाटकातील काही क्षण एडिट केले आहे त्यामध्ये म्हटलं आहे, सगळं विसरायचं; पण बाप नाही विसरायचा, त्याला भेटण्याने, जवळ बसल्याने, मायेने विचारपुस केल्याने तो कनसाळतो.. त्याला नाही विसरायचं त्याच्या चेहऱ्यावरील सुरकुत्यांमध्ये सुख व्होवून व्हायचं.” त्यानंतर अमोल कोल्हे आणि शरद पवार यांचा फोटो आहे आणि त्यावर लिहलं आहे “आम्ही साहेबांसोबत”

अमोल कोल्हे यांच्या या व्हिडिओ ट्विटनंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी कोल्हे यांचे ट्विट रिट्विट करत म्हंटल आहे, “पहिला मोहरा परत..!”

हेही वाचा 

Back to top button