

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीलाही भगदाड पाडण्यात भारतीय जनता पक्षाला अखेर यश आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपच्या गळाले लागले. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रवादीला हा मोठा धक्का मानला जात असून, या फुटीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार काय म्हणाले याबाबतचे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की," महाराष्ट्राच्या राजकारणाचे साफ मातेरे करण्याचां विडा काही लोकांनी उचलला आहे. त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या. माझे आताच श्री.शरद पवार यांच्याशी बोलणे झाले. ते म्हणाले, "मी खंबीर आहे. लोकांचा पाठिंबा आपल्याला आहे. उद्धव ठाकरेंसह पुन्हा सर्व नव्याने उभे करू."होय, जनता हे खेळ फार काळ सहन करणार नाही.
हेही वाचा