मुंबई : अजित पवार ठरले ११ वे उपमुख्यमंत्री | पुढारी

मुंबई : अजित पवार ठरले ११ वे उपमुख्यमंत्री

मुंबई ; पुढारी वृत्‍तसेवा शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीलाही भगदाड पाडण्यात भारतीय जनता पक्षाला अखेर यश आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह गळाले लागले आहेत. राष्ट्रवादीतील काही नेत्यांचा आज (रविवार) शपथविधी पार पडला. यावेळी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

उपमुख्यमंत्री म्हणून आतापर्यंत अजित पवार यांच्यासह १० जणांनी हे पद भूषविले आहे. यापूर्वी अजित पवार यांनी या पदाची पहाटेचा शपथविधी धरून तीन वेळा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. आज त्यांनी शपथ घेतल्याने ते राज्याचे ११ वे उपमुख्यमंत्री ठरले.

महाराष्ट्राचे आतापर्यंतचे उपमुख्यमंत्री पुढीलप्रमाणे…

नाशिकराव तिरपुडे
५ मार्च १९७८ ते १८ जुलै १९७८

सुदंरराव सोळंके
१८ जुलै १९७८ ते १७ फेब्रुवारी १९८०

रामराव आदिक
२ फेब्रुवारी १९८३ ते ५ मार्च १९८५

गोपीनाथ मुंडे
१४ मार्च १९९५ ते ११ ऑक्टोबर १९९९

छगन भुजबळ
१८ ऑक्टोबर २३ डिसेंबर २००३

विजयसिंह मोहिते पाटील
२७ डिसेंबर २००३ ते १९ ऑक्टोबर २००४

आर आर पाटील
१ नोव्हेंबर २००४ ते १ डिसेंबर २००८

छगन भुजबळ
८ डिसेंबर २००८ ते १० नोव्हेंबर २०१०

अजित पवार
२५ ऑक्टोबर २०१२ ते २६ सप्टेंबर २०१४

२३ नोव्हेंबर २०१९ ते २६ नोव्हेंबर २०१९
(पहाटेचा शपथविधी )

३० डिसेंबर २०१९ ते २९ जून २०२२

देवेंद्र फडणवीस

३० जून २०२२ पासून

हेही वाचा : 

Back to top button