Accident-Prone Places : राज्यभरातील रस्त्यांवर १,००४ ‘ब्लॅक स्पॉट’

Accident-Prone Places : राज्यभरातील रस्त्यांवर १,००४ ‘ब्लॅक स्पॉट’
Published on
Updated on

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील विविध रस्त्यांवर तब्बल 1,004 अपघातप्रवण ठिकाणे (ब्लॅक स्पॉट) आढळून आली आहेत. यासंदर्भातील यादी नुकतीच परिवहन विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दिली आहे. यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत. विशेष म्हणजे, राष्ट्रीय महामार्गावर सर्वाधिक 610 'ब्लॅक स्पॉट'ची नोंद करण्यात आली आहे. सोलापूर शहर आणि ग्रामीणमध्ये त्याची संख्या 58 आहे. मुंबईत ही संख्या 48 इतकी नोंदविण्यात आली आहे. (Accident-Prone Places)

राज्याच्या परिवहन विभागातर्फे विविध महामार्ग, रस्त्यांवरील अपघातांची ठिकाणे निश्चित करून 'ब्लॅक स्पॉट' ठरविले जातात. त्यानंतर या ठिकाणांची यादी विभागांकडे सुपूर्द केली जाते. त्यानुसार काही दिवसांपूर्वीच परिवहन विभागाने यादी निश्चित करून माहिती दिली आहे. (Accident-Prone Places)

या 'ब्लॅक स्पॉट'ची नोंद करून त्या ठिकाणी रस्त्यांचे रुंदीकरण करणे, दिशादर्शक फलक लावणे व इतर व्यवस्थापन करण्यासह खबरदारीच्या सूचना दिल्या जातात. (Accident-Prone Places)

या यादीनुसार राष्ट्रीय महामार्गावर एकूण 610 ठिकाणे 'ब्लॅक स्पॉट' म्हणून घोषित केली आहेत. त्यात सर्वाधिक म्हणजे 45 अहमदनगर येथे आढळून आली आहेत. त्याखालोखाल मुंबई 48, नांदेड 40, सोलापूर ग्रामीणमध्ये 37, नाशिक ग्रामीणमध्ये 37, नागपूर ग्रामीण 37, सातारा 35, धुळे 34, नंदुरबार 30, ठाणे शहर 15, नागपूर शहर 13, नाशिक शहर 17, नवी मुंबई 15, पुणे शहर 13, सोलापूर शहर 21, पिंपरी-चिंचवड 17, अमरावती ग्रामीण 16, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण 15, बीड 12, चंद्रपूर 11, जालना 13, कोल्हापूर 15, पुणे ग्रामीण 9, पालघर 11, रायगड 11, रत्नागिरी 6, सांगली 15, ठाणे ग्रामीण 9, वर्धा 15 आदींचा समावेश आहे. राज्य महामार्गावर 202 ठिकाणी 'ब्लॅक स्पॉट' आढळून आले आहेत. यामुळे अपघात वारंवार घडतात.

120 'ब्लॅक स्पॉट'ची कामे पूर्ण

परिवहन विभागाने सार्वजनिक विभागाला दिलेल्या आकडेवारीनुसार, राष्ट्रीय महामार्गांवरील 610 पैकी 120 ब्लॅक स्पॉटची कामे पूर्ण केली आहेत. 84 ब्लॅक स्पॉटची कामे सुरू असून, लवकरच ती पूर्ण करण्यात येणार आहेत. ही कामे करण्यासाठी तीन संस्थांकडे जबाबदारी देण्यात येते. यात एचएआय, एमएसआरडीसी, एनएच यांचा समावेश आहे.

राज्यातील 'ब्लॅक स्पॉट'

राष्ट्रीय महामार्ग…………………610
राज्य महामार्ग………………….202
मुख्य जिल्हा रस्ता ……………..4
ग्रामीण रस्ता…………………..178
मुक्त मार्ग…………………….10

अधिक वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news