

पुढारी ऑनलाइन डेस्क : Monsoon Update : बळीराजा ते सर्वसामान्यांपर्यंत सगळ्यांचेच लक्ष मान्सूनच्या आगमनाकडे लागले आहे. आज अखेर मान्सूनची प्रतीक्षा संपली. नैऋत्य मान्सूनचे आज 11 जून ला #महाराष्ट्रात आगमन झाले आहे. दक्षिण कोकणातील काही भाग, द.मध्य महाराष्ट्राचा काही भाग, संपूर्ण गोवा, कर्नाटकचा व तामीळनाडू व आंध्रप्रदेशचा काही भाग व्यापला. NLM : रत्नागिरी, शिमोगा, हसन, धरमपुरी, श्रीहरीकोटा … दुभरी, इथपर्यंत मान्सूनने व्यापले आहे, अशी माहिती IMD पुण्याचे प्रमुख के. एस. होशाळीकर यांनी ट्विट करून दिली आहे.
यंदा नैऋत्य मान्सूनचे आगमन हे आठ दिवस उशिरा झाले आहे. साधारणपणे १ जूनला मान्सून केरळमध्ये दाखल होणे अपेक्षित असते. त्यानंतर सहा ते सात दिवसांनी मान्सून कर्नाटक गोवा आणि महाराष्ट्रात दाखल होतो. यावर्षी मान्सून केरळमध्ये ८ जूनला दाखल झाले. त्यानंतर आज ११ जूनला महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून बळीराजासह उकाड्याने हैराण सर्वजणच मान्सूनच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत होते. आज अखेर ही प्रतीक्षा संपली आहे. मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन झाले आहे.
हे ही वाचा :