Sanjay Raut : हुकूमशाही प्रवृत्तीशी लढावेच लागेल : संजय राऊत

पुढारी ऑनलाईन डेस्क : जेलमध्ये जाऊन आलो; पण मी दबावाला घाबरलो नाही. गुन्हा दाखल करण्यासाठी शिंदे आणि फडणवीस यांचा दबाव आहे. मी घाबरणार नाही. जरी माझ्यावर गुन्हा दाखल झाला असला तरी मी चौकशीला सामोरे जाईन. मी कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही. शरण जाणार नाही. हुकुमशाही प्रवृत्तीशी लढावच लागेल, अशा शब्दांमध्ये ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी आज (दि.१५) सरकारला आव्हान दिले.
राज्यातील सरकार बेकादेशीर : Sanjay Raut
‘महाराष्ट्रातील सरकार तीन महिन्यात जाणार, मरण अटळ आहे. बेकायदा सरकारचे बेकायदा आदेश पाळू नका तुम्ही अडचणीत याल’, असे विधान राऊत यांनी नाशिक येथे १२ मे राेजी केले हाेते. या प्रकरणी यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला हाेता. यासंदर्भात पत्रकार परिषदेत बाेलताना राऊत म्हणाले की, “मी कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही. शरण जाणार नाही. या सरकारणे नेमलेला नेता बेकायदेशीर आहे. घेतलेले निर्णय बेकायदेशीर आहेत, राज्यपालांनी केलेला कारभार बेकायदेशीर आहे. सरकारवर अजुनही अपात्रेतेची टांगती तलवार असेल तर हे सरकार बेकायदेशीर आहे, असा पुन्नरुच्चारही त्यांनी केला.
कर्नाटकमध्ये जनता कॉंग्रेसच्या पाठीमागे
कर्नाटक निवडणूक आणि कॉंग्रेसने मिळवलेला विजय या संदर्भात बोलत राऊत म्हणाले की,”कर्नाटकमध्ये लोटस होत तिथे पाकळ्या गळून पडल्या आहेत. भाजपाने सर्व यंत्रणा राबुवनही सत्ता मिळवता आली नाही. कर्नाटकमध्ये जनता कॉंग्रेसच्या पाठीमागे राहीली. बदल हाेवू शकताे हा धडा कॉग्रेसने देशाला दिला आहे.
Sanjay Raut : गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांवर दबाव
संजय राऊत यांनी त्यांच्यावर झालेल्या गुन्ह्यासंदर्भात एक ट्विट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “नाशिक पोलिसांनी माझ्या विरोधात भा. द. वि. कलम 505(1) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांवर मुख्यमंत्री व गृहमंत्री महोदयांचा दबाव होता. माझा गुन्हा काय? सुप्रीम कोर्टाच्या निकालनंतर सरकारचे “गठन”बेकायदेशीर ठरले आहे. व्हिपपासून शिंदे यांना गटनेते पदी निवड करण्यापर्यंत सगळेच घटनाविरोधी ठरवले आहे. सोळा आमदार कोणत्याही क्षणी अपात्र ठरविले जातील अशी स्थिती आहे. बेकायदेशीर सरकारचे आदेश प्रशासनानं पाळू नयेत. भविष्यात खटले दाखल होतील. असे मत मी व्यक्त केले. हा अपराध आहे का? सरकारने थेट गुन्हाच दाखल केला. मी कारवाईला घाबरत नाही. या हुकूमशाही प्रवृत्तीशी लढावेच लागेल.” असे राऊत यांनी म्हटले आहे. हे ट्विट राऊत यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि आदित्य ठाकरे यांना टॅग केलं आहे.
#WATCH | “I have only said that after the order of the Supreme Court, I think this govt is illegal and if the govt officials will follow the order of this govt then it will be illegal & action might be taken against them in the coming days,” says Uddhav faction leader and MP… https://t.co/E45r9MmHnq pic.twitter.com/akLdwpxomR
— ANI (@ANI) May 15, 2023
हेही वाचा
- ED Summons Jayant Patil | जयंत पाटील यांना ईडीचे दुसऱ्यांदा समन्स, २२ मे रोजी चौकशीला हजर राहण्याची सूचना
- Karnataka New CM : कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री? मल्लिकार्जून खर्गे यांच्या हाती सोपविली ‘ही’ जबाबदारी