ED Summons Jayant Patil | जयंत पाटील यांना ईडीचे दुसऱ्यांदा समन्स, २२ मे रोजी चौकशीला हजर राहण्याची सूचना

Maharashtra hospital deaths
Maharashtra hospital deaths

पुढारी ऑनलाईन : कथित आयएल आणि एफएस (IL&FS) घोटाळ्याच्या चौकशीसाठी सक्तवसुली संचालनालयाने (Enforcement Directorate) राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांना दुसऱ्यांदा समन्स बजावले आहे. त्यांना २२ मे रोजी ईडीसमोर हजर राहण्यास सांगितले आहे. (ED Summons Jayant Patil) याआधी जयंत पाटील यांना 'ईडी'ने शुक्रवारी १२ मे रोजी चौकशीसाठी हजर राहण्‍याचे आदेश दिले होते. आयएल आणि एफएसच्या कथित घोटाळ्याप्रकरणी  हा समन्स बजावण्यात आला होता.

या कंपनीशी माझा कधी संबंध आला नाही आणि मी कधी कोणाशी या संदर्भात बोललोही नाही. मी चाैकशीला सामाेरे जाईन,  माझी राजकीय कारकीर्द ही खुली किताब आहे, असे जयंत पाटील यांनी याआधी म्हटले होते.

काय आहे आयएल आणि एफएस?

आयएल आणि एफएस या कंपनीच्या व्यवहारांची 'ईडी'कडून चौकशी सुरू होती. कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली होती. या कंपनीच्या माध्यमातून मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. याआधीही या कंपनी प्रकरणी राज ठाकरे यांनाही नोटीस पाठवण्यात आली होती. आर्थिक व्यवहारात अनियमितता होती. यात मनी लाँड्रिंग झालं आणि पोलिसांनी यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकऱणी अरुणकुमार साहा यांना ताब्यात घेऊन चौकशी केली होती. यामध्ये अनेक नावे समोर आली आहेत. त्यात जयंत पाटील यांच्याही नावाचाही समावेश आहे.

 हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news