Karnataka Election Result – कर्नाटकात लोकशाहीचीच स्टोरी चालली : संजय राऊत | पुढारी

Karnataka Election Result - कर्नाटकात लोकशाहीचीच स्टोरी चालली : संजय राऊत

पुढारी ऑनलाईन डेस्क : मोदी आणि शाहांना कर्नाटकात झिडकारलं. देशाची मन की बात कर्नाटकातून बाहेर पडली. कर्नाटकात गृहमंत्र्यांच्या दबावाला झुगारलं गेलं. कर्नाटकात लोकशाहीचीच स्टोरी चालली, अशी प्रतिक्रिया शिवसेनचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली. ते माध्यमांशी बोलत होते.

संजय राऊत म्हणाले- राज्यातून कर्नाटकात मोठी टोळी गेली होती. महाराष्ट्र एकीकरण समितीला हरवण्यासाठी पैशांचा महापूर आणला. फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांनी पैसे वाटप केले.

कर्नाटकातील २२४ जागांचे निकाल आज जाहीर होत आहेत. राज्यभरात ३४ ठिकाणी मतमोजणी होणार आहे. संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेणारी कर्नाटक विधानसभा निवडणूक आगामी वर्षी होणार्‍या लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम मानली जाते. इथे काँग्रेस जिंकली, तर केंद्रातही सत्तापालटाची आशा काँग्रेससह तिसर्‍या आघाडीला राहील. मात्र, भाजप जिंकला, तर पुढच्या वर्षीची लोकसभा निवडणूक तो पक्ष आणखी जोमाने लढवेल. कर्नाटकात सध्या भाजपची सत्ता आहे.

Back to top button